Ladki bahin kyc – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र असलेल्या सर्व महिला लाभार्थ्यांना ekyc करण्याचं आवाहन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत kyc का करायची, कशी करायची घ्या जाणून.

Ladki bahin Kyc 2025
राज्यात महिला सक्षमीकरण करिता राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शक व्हावी, अपात्र लाभार्थी पडताळणी व्हावी यासाठी ladki bahin kyc प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Mukhyamantri majhi ladki bahin yojana kyc GR
पहा कशी करायची लाडकी बहीण योजनेची KYC
Ladki bahin kyc का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिला लाभार्थ्यांची पडताळणी करणे, बोगस लाभार्थी शोध असे अनेक उद्देश या kyc मुळे साध्य होणार आहेत.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
लाभार्थ्यांना आपल्या मोबाईलवर ही प्रक्रिया सहज पार पाडता येणार आहे.
पुढील दोन महिने ही ladki bahin kyc प्रक्रिया सुरू असणार आहे.
लाडकी बहीण योजनेतील या kyc प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार.
कशी करायची Ladki bahin kyc
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना e-KYC करण्यासाठी लाभार्थ्याला https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
या पोर्टल वर आल्यानंतर मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC करण्यासाठी एक पॉप अप दाखवला जाईल यावर क्लिक केल्यावर ladki bahin e KYC साठीचा फॉर्म उघडेल.
या फॉर्ममध्ये लाभार्थ्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे व खाली दिलेला पडताळणी संकेतांक (Captcha Code) टाकायचा आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत आहोत अशी एक सहमती द्याची आहे.
त्यानंतर खाली दिलेल्या Send OTP या बटणावर क्लिक करायचे आहे. ताबडतोब लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP पाठविला जाईल, आलेला OTP टाकून सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर पोर्टल लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही. ते तपासेल. जर ladki bahin kyc या पूर्वीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा मेसेज दाखवला जाईल.
मात्र जर kyc प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
लाभार्थी हा पात्र लाभार्थी यादीत असेल, तर kyc करण्यासाठी पुढील टप्प्याला जाता येणार आहे.
पुढे लाभार्थ्याना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक व खाली दिलेला पडताळणी संकेतांक (Captcha Code) टाकायचा आहे.
पुढे संमती दर्शवून Send OTP वर क्लिक केल्यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक otp पाठवला जाईल.
पाठविण्यात आलेला OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो otp टाकून Submit बटणावर क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याला सर्वात प्रथम आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल.
यानंतर लाभार्थ्यांना काही बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागणार आहेत ज्यात.
१. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
जर कोणी लाभार्थी असे असतील तर त्यांनी होय करायचे आहे आणि लाभ घेत असेल तर नाही करायचे आहे.
2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
यातही होय किंवा नाही मध्ये हे उत्तर द्यायचे आहे.
या तिन्ही बाबींची नोंद पूर्ण करून शेवटी सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
आपली kyc पूर्ण होईल व आपली kyc “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा मेसेज दाखविला जाईल.
लाडकी बहीण योजनेची ही ekyc प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन शासना कडून करण्यात आले आहे.
पुढील वर्षी ही प्रक्रिया जून 2026 पासून सुरू केली जाईल.