AHD Maharashtra राज्यात पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा, शासन निर्णय येथे पहा.

AHD Maharashtra Animal Husbandry GR
राज्यात पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा
राज्याच्या एकूण उत्पन्नात सद्य स्थितीत कृषि क्षेत्राचा वाटा १२ टक्के इतका आहे. यामध्ये कृषि क्षेत्राच्या एकूण उत्पन्नामध्ये पशुजन्य उत्पन्नाचा वाटा २४ टक्के इतका आहे.
सन २०२१ मध्ये निती आयोगाने सादर केलेल्या अहवालात पशुसंवर्धन व्यवसायापासून राज्याच्या उत्पादनात पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढविण्यासाठी काही उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. राज्यातील पशुपालकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या जसे कृषि वीज दराच्या तुलनेत जास्त वीज दर, सौर उर्जेसाठी अनुदानाचा अभाव, ग्रामपंचायत कर, शेती कर्जाच्या व्याज दराच्या तुलनेत अधिक व्याज दराची आकारणी अशा अनेक अडचणींचे निराकरण झाल्यास राज्यात शेतकऱ्यांचा पशुपालन व्यवसायाकडे कल वाढू शकतो.
यामुळे पशुजन्य व्यवसायापासून उत्पादनात वाढ होईल. पशुपालकांच्या व्यावसायिक नफ्यात वाढ व्हावी तसेच स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल. यामुळे पशुजन्य उत्पादित बाबीना मुल्यवर्धन साखळीची निर्मिती, शेती प्रमाणे गट पद्धतीने पशुसंवर्धन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब यासारख्या बाबीमध्ये आपोआप वाढ होईल.
या सर्व बाबी साठी पशुपालक व्यवसायास प्रोत्साहन देताना कृषि व्यवसायाप्रमाणे सवलती देणे आवश्यक असल्याने पशुपालन व्यवसायास “कृषि समकक्ष दर्जा देण्याची राज्य मंत्रिमंडळाने दि १०.०७..२०२५ रोजी मान्यता दिली आहे.
याच अनुषंगाने आज ३१ जुलै २०२५ रोजी शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे.
GR PDF कृषी समकक्ष दर्जा
पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याबाबत.
एकूण १०,००० मांसल पक्षी व २५,००० अंड्यावरील पक्षी क्षमता असलेल्या कुक्कुट उद्योगाला लघु स्वरूपाचा व्यवसाय मानण्यात येते.
एकूण २५,००० मांसल कुक्कुट पक्षी व ५०,००० अंडयावरील पक्षी क्षमता असलेल्या कुक्कुट उद्योगाला मध्यम स्वरुपाचा व्यवसाय मानण्यात येते.
५० दुधाळ जनावरांचा गोठा, २०० शेळी-मेंढी गोठा व १०० पर्यंतच्या वराह पालन व्यवसायास लघु स्वरुपाचा व्यवसाय समजण्यात येते.
याचबरोबर १०० दुधाळ जनावरांचा गोठा, ५०० शेळी/मेंढी गोठा आणि २०० पेक्षा जास्त वराह पालन करणे यांस मध्यम स्वरुपाचा व्यवसाय समजण्यात येते.
लघु व मध्यम स्वरुपाचा व्यवसाय करणाऱ्या कुटुबांची संख्या विचारात घेता, जास्तीत जास्त पशुपालकांना फायदा होऊन पशुपालन व्यवसायाकडे इतर लोकांनी आकृष्ट व्हावे, यादृष्टीने खालील प्रकल्प क्षमतेच्या पशुपालक कृषि समकक्ष दर्जाच्या अनुषंगाने अनुज्ञेय ठरणाऱ्या लाभास पात्र ठरतील.
- २५,००० पर्यत मांसल कुक्कुट पक्षी / ५०,००० पर्यत अंडयावरील कुक्कुट पक्षी क्षमता.
- ४५,००० पर्यत क्षमतेच्या हॅचरी युनिट.
- १०० पर्यत दुधाळ जनावरांचा गोठा
- ५०० पर्यत मेंढी / शेळी गोठा.
- २०० पर्यत वराह.
मात्र यामध्ये ब्रिडर कुक्कुटपालन व्यवसाय व पशुजन्य उत्पादनावरील प्रक्रिया उद्योगांना कृषि समकक्ष दर्जाच्या लाभ दिले जाणार नाहीत. पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिल्यामुळे खालील लाभ मिळतील.
२५,००० पर्यत मांसल कुक्कुट पक्षी / ५०,००० पर्यंत अंडयावरील कुक्कुट पक्षी क्षमतेच्या तसेच ४५,००० पर्यत क्षमतेच्या हॅचरी युनिटच्या कुक्कुटपालन व्यवसाय, १०० पर्यत दुधाळ जनावरे संगोपन, ५०० पर्यत मेंढी / शेळी पालन व २०० पर्यत वराह या पशुसंवर्धन विषयक व्यवसायासाठी वीज दर आकारणी “कृषी इतर” या वर्गवारीनुसार न करता “कृषि” वर्गवारीप्रमाणे वीज आकारणी करण्यात येईल. कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सौरउर्जा पंप व इतर सौरउर्जा संच उभारण्यास कृषि व्यवसायास देण्यात येणाऱ्या दराने अनुदान / सवलत देण्यात येईल.
पशुपालन व्यवसायास स्वतंत्र व्यवसाय न समजता शेती व्यवसाय समजून कृषि व्यवसायास ज्या दराने ग्रामपंचायत कर आकारणी केली जाते त्याच दराने व राज्यभरात समान दराने ग्रामपंचायत कर आकारणी करण्यात येईल.
पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या खेळत्या भागभांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जासाठी “पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना” च्या धर्तीवर व इतर प्रयोजनासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज दरात ४% पर्यंत सवलत देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा
अपेक्षित परिणाम:
• ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना
• दुग्ध, मांस व पशु व कुक्कुट जन्य उत्पादनात वाढ
• उद्यमशीलतेत वाढ आणि व्यावसायिकता निर्माण
• मूल्यवर्धन साखळी आणि आधुनिक पशुपालन प्रणालींचा प्रसार
.कृषी व्यवसायाप्रमाणेच पशुपालन व्यवसायात समान कर आकारणी
#पशुसंवर्धन #कृषीसमकक्षदर्जा #महाराष्ट्रसरकार #DairyFarming #PoultryFarming #GoatFarming #AnimalHusbandry