राज्यात फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची नुकसान भरपाई मंजूर Avkali bharpai 2025

Avkali bharpai 2025 GR
ही अतिवृषी भरपाईची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी SDRF मधून दिली जाते. या निविष्ठा अनुदान मदतीमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या आर्थिक अडचणीतून सावरण्यास मदत होते.
अशाच राज्यात माहे फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
शासन निर्णय २९ जुलै २०२५
शासन निर्णय 22 जुलै 2025
राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी, 2025 ते मे, 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत
फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागामधील ६७ हजार ४६२ शेतकऱ्यांच्या ३४ हजार ५४२.४६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ५९ कोटी ९८ लाख २० हजार.
पुणे विभागातील १ लाख ७ हजार ४६३ शेतकऱ्यांच्या ४५ हजार १२८.८८ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८१ कोटी २७ लाख २७ हजार,नाशिक विभागातील १ लाख ५ हजार १४७ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ९३५.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८५ कोटी ६७ लाख ८ हजार
कोकण विभागातील १३ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या ४ हजार ४७३.६९ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार, अमरावती विभागातील ५४ हजार ७२९ शेतकऱ्यांच्या ३६ हजार १८९.८६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ६६ कोटी १९ लाख ११ हजार आणि नागपूर विभागातील ५० हजार १९४ शेतकऱ्यांच्या २० हजार ७८३.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ३४ कोटी ९१ लाख ६३ हजार रुपये मदतीचा समावेश आहे.