जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत तारीख जाहीर | ZP election 2022

जिल्हा परिषद ( zp election 2022 ) व पंचायत समिती निवडणूक आरक्षण सोडत तारीख जाहीर; वाचा कधी आहे आरक्षण सोडत

Zp election 2022

ZP election Maharashtra 2022 reservation circular

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीच्या आरक्षणाच्या सोडतीची तारीख निवडणूक आयोगाने अखेर जाहीर केली आली आहे, याबाबतचा आदेश देखील राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे.

Election commission circular PDF येथे पहा.

ZP election Circular

निवडणूक आयोगाने काढलेल्या या आदेशात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांच्या मार्गासवर्ग प्रवर्गाकरिता (OBC reservation) जागा राखून ठेवल्या आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रमात जिल्हा परिषदे साठी 28 जुलै रोजी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम घेतला जाईल तर पंचायत समिती साठी त्या तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात ही आरक्षण सोडत जाहीर केली जाईल.

या आदेशातील वेळापत्रकानुसार दिनांक 26 जुलै आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रा प्रसिद्ध केली जाणार आहे.

आरक्षित जागा व सोडत 28 जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे.

गणनिहाय आरक्षणाची प्रारूप अधिसूचना 29 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार असून 02 august पर्यंत जिल्हा अधिकाऱ्याकडे या संबंधात हरकती व सूचना करता येतील.

याबाबतच्या असलेल्या हरकती जिल्हा अधिकाऱ्यांना 02 august पर्यंत निवडणूक आयोगाकडे देणे बंधनकारक असेल. आलेल्या हरकती आणि आलेल्या सूचनाबाबत जिल्हाधिकारी यांचे अभिप्राय लक्षात घेऊन 05 august रोजी राज्य निवडणूक आयोग आरक्षणास मान्यता देईल.

ज्यामध्ये 25 जिल्हा परिषद आणि 2८४ पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ही आरक्षण सोडत होणार आहे यामध्ये अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्व साधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर केलं जाणार आहे.

या परिपत्रका नुसार २५ जिल्हा परिषद आणि २४ पंचायत समित्यासाठी 28 जुलैला जी आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणारी सोडत ही OBC reservation होणार आहे.

तसेच या सोडती नंतरचा नेमका निकाल देखील जिल्हाधिकाऱ्यांना आपला कार्यालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणे बंधनकारक असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: