Zp Arogya bharati 2022 नवीन वेळापत्रक जाहीर !

बहु प्रतिक्षित, बहु विवादित जिल्हा परिषद आरोग्य विभाग पदभरती ( Zp Arogya bharati 2022 ) साठी अखेर नवीन वेळापत्रक जाहीर.

Zp Arogya bharati

Zp Arogya bharati 2022 New Timetable

मार्च 2019 पदभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या आखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट प्रवर्गाच्या पदभरती बाबत १० मे 2022 रोजी शासन निर्णय घेऊन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत.

१० मे २०२२ चा GR खालील लिंक वर पहा

त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आखत्यारीतील सर्व रिक्त पद यापुढे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळमार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्यास शासनाचे मान्यता देण्यात आलेले आहे.

सदर शासन निर्णय जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी ( Zp Arogya vibhag ) संबंधित आरोग्य सेवक आरोग्य सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य पर्यवेक्षक या पाच प्रवर्गातील रिक्त पदा भरण्याच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करण्याबाबत काढण्यात आलेला आहे.

आणि आता याच पदभरतीसाठीची परीक्षा ( Zp Arogya bharati exam ) आयोजित करण्याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 26 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेला आहे.

ज्या शासन निर्णयानुसार या पदभरतीसाठी नवीन वेळापत्रक ( Zp Arogya bharati new timetable )जाहीर करण्यात आलेला आहे आणि याच वेळापत्रकानुसार या कार्यक्रमानुसार आताही पदभरती घेतली जाणार आहे.

याचप्रमाणे 2019 मध्ये काढण्यात आलेली जाहिरात याच प्रमाणे ऑगस्ट 2021 मध्ये अपंग व इतर सुधारित आरक्षणासह काढण्यात आलेले जाहिरात या जाहिरातीनुसार ही पद भरतीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

या पदभरतीच्या प्रक्रियेमध्ये बिंदू नामावली अंतिम करणं याच्यासाठी दोन आठवड्याचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे जो 27 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2022 असा असणार आहे.

विभागीय स्तरावरून कंपनीची निवड अंतिम करणं याच्यासाठी 16 सप्टेंबर 2022 पर्यंत अंतिम तारीख ठेवण्यात आलेली आहे.

निवड झालेल्या कंपनीने मे न्यास कंपनीकडून डेटा हस्तांतर करून घेणे याच्यासाठी एक आठवड्याचा टाईम देण्यात आलेला आहे 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

निवड झालेल्या कंपनीने संवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समितीस कळवण्यासाठी 27 सप्टेंबर 2022 ची मुदत देण्यात आलेली आहे.

जिल्हा निवड समितीने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजना संदर्भात कारवाई करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ देण्यात आलेला आहे जो 4 ऑक्टोबर 2022 पर्यंत असणार आहे.

जिल्हा निवड समितीने शासनाकडून निवड झालेल्या कंपनीमार्फत पात्र उमेदवाराचे प्रवेश पत्र ( Zp Arogya bharati hall ticket ) तयार करून सबंधित उमेदवाराला ते डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी पाच दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे जो ५ ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2022 असा असणार आहे.

परीक्षेचा आयोजन हे ऑनलाइन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ( Online Exam computer based ) असणार आहे ज्याच्यासाठी 15 ऑक्टोबर 2022 रोजी आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी सकाळी 11 ते दुपारी १ वाजेपर्यंत तर औषध निर्माता या पदासाठी दुपारी ३ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या कालावधीमध्ये परीक्षा ( Zp Arogya bharati exam ) असणार आहे.

तर 16 ऑक्टोबर 2022 रोजी आरोग्य सेवक ( पुरुष ) आरोग्य सेविका या पदासाठी सकाळी 11 ते दुपारी १ वाजेपर्यंत तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ दुपारी ३ वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत ही परीक्षा पार पाडली जाणार आहे.

लेखी परीक्षेनंतर answer key प्रसिद्ध करण, उमेदवारांना ऑब्जेक्शन फीलिंगसाठी तीन दिवसाचा वेळ देणं, अंतिम निकाल जाहीर करणं, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे व त्या अनुषंगाने नियुक्ती आदेश देणे यासाठी पाच आठवड्याचा कालावधी घेण्यात आलेला आहे जो 17 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 असा असणार आहे.

आणि या वेळापत्रकानुसार ही पदभरतीची परीक्षा निश्चित केली जाऊन ही पद भरतीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे सदरचा वेळापत्रक प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळावरती तसेच कार्यालयीन दर्शनी भागामध्ये प्रसिद्ध करावं.

सर्वांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करावं अशा प्रकारचे निर्देश सुद्धा या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.

या परीक्षेचं या भरतीच गांभीर्य तसेच तातडी लक्षात घेऊन सर्व वरील सूचनांचं तसेच शासनाने निर्णयाचं पालन तंतोतंत करावं सूचनाच पात्रतेच्या निकषाच पालन तंतोतंत करावं आणि याच्यामध्ये जर कसूर केली तर कसूर करणाऱ्या सबंधित आवरती जबाबदारी निश्चित करण्यात येऊन शिस्तबंग विषय कारवाई केली जाईल अशा प्रकारचे काही आदेश निर्देश सूचना सुद्धा या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.

हा शासन निर्णय आपण Maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता

Shasan nirnay pdf link

माहे मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील पदभरती बाबत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: