अतिवृष्टी सह विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित यवतमाळ जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ( Yavatmal Kharip paisewari ) जाहीर.

Yavatmal Kharip paisewari 2023 hangami paisevari
राज्यात खरिप पीक परिस्थिती कशा पद्धतीची आहे, पिकांचे नुकसान, घटलेली उत्पादकता याची माहिती दर्शविण्यासाठी आणेवारीचा आधार घेतला जातो.
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील दोन लाख ५६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान होवून १० हजार हेक्टरवरील शेती अतिवृष्टीने खरडून गेली. जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या लहीरपणामुळे हवालदिल झाला असताना प्रशासनाने शनिवारी 30 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या नजर आणेवारीत ( hangami paisevari 2023 ) जिल्ह्यातील 2046 गावांची पैसेवारी ६१ पैसे जाहीर केली. त्यामुळे जिल्ह्यातील पीक स्थिती उत्तम असल्याचा निष्कर्ष निघत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याचा धोका व्यक्त होत आहे.
दरवर्षी ३० सप्टेंबरला नजर आणेवारी काढली जाते. यात ५० पैश्यांपेक्षा कमी आणेवारी निघाल्यास शेतकऱ्यांना विविध सवलती मिळतात. मात्र यावर्षीच्या खरीप हंमागात पाऊस विलंबाने आल्याने सुरुवातील पेरणी खोळंबली.
त्यानंतर जुलैच्या मध्यापासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी झाली. यात बहुतांश तालुक्यातील पिके खरडून गेली. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले.
या दुहेरी संकटात सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचचले.
सध्या शेतात असलेल्या सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांवर कीड आली आहे. सोयाबीनचे पीक शेंग धरण्यापूर्वीच पिवळे पडल्याने वाळत आहे. तर कपाशीवर बोंड व गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण ११० मंडळांपैकी १५ मंडळांत सर्वाधिक नुकसान झाले आहे.
या नजर अंदाज पैसेवारीमध्ये यवतमाळ जिल्ह्याची सरासरी आणेवारी 61 पैसे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हातील दोन हजार ४६ गावांमधील पीक पैसेवारी 61 टक्क्यांच्या आतमध्ये असल्याचे पुढे आले आहे.
जर जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्क्याच्या आतमध्ये असेल तर संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त समजला जातो. जिल्ह्याची पैसेवारी ( Kharip Paisevari ) ५० टक्के आत असेल तर विविध हा निर्णय उपयोगी पडतो.
कृषिपंपाच्या वीज बिलामध्ये सवलत दिली जाते.
शेतकयांच मुलांच्या शिक्षणाच्या फीमध्ये देखील सवलत असते. शेतसारा भरताना सूट मिळते.