अतिवृष्टी सह विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित यवतमाळ जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ( Yavatmal Kharip paisewari ) जाहीर, नुकसान भरपाई सह शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा.

Yavatmal Kharip paisewari 2022 Sudharit
यवतमाळ जिल्ह्याची आणेवारी ( Yavatmal Kharip paisewari ) ४७ टक्के ओल्या दुष्काळाचा परिणाम, उत्पादकता घटली.
राज्यात खरिप पीक परिस्थिती कशा पद्धतीची आहे, पिकांचे नुकसान, घटलेली उत्पादकता याची माहिती दर्शविण्यासाठी आणेवारीचा आधार घेतला जातो.
जिल्ह्यातील एकूण ११० मंडळांपैकी १५ मंडळांत सर्वाधिक नुकसान झाले आहे, या नुकसानीचा सुधारित आणेवारीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने सोमवार 31 ऑक्टोबर 2022 जाहीर केला आहे.
या सुधारित पैसेवारीमध्ये यवतमाळ जिल्ह्याची सरासरी आणेवारी ४७ टक्के जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हातील दोन हजार ४६ गावांमधील पीक पैसेवारी ४७ टक्क्यांच्या आतमध्ये असल्याचे पुढे आले आहे.
अशी आहे यवतमाळ जिल्ह्यातील सुधारित पैसेवारी Yavatmal Kharip paisewari
यवतमाळ ४८ टक्के, कळंब ४८ टक्के, बाभूळगाव ४८ टक्के आण ४७ टक्के, दारव्हा ४८ टक्के, दिवस ४७ टक्के, नेर ४६ टक्के, पुसद ४७ टक्के, उमरखेड ४८ टक्के, महागाव ४७ टक्के, केळापूर : ४९ घाटी ४८, राळेगाव ४७ टक्के, वणी ४७ टक्के, मारेगाव ४७ टक्के, झरी जामणी ४८ टक्के.
जर जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्क्याच्या आतमध्ये असेल तर संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त समजला जातो.
जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्के आत असेल तर विविध हा निर्णय उपयोगी पडतो.
कृषिपंपाच्या वीज बिलामध्ये सवलत दिली जाते.
शेतकयांच मुलांच्या शिक्षणाच्या फीमध्ये देखील सवलत असते. शेतसारा भरताना सूट मिळते.