वाशीम जिल्ह्याची खरिप पिकांची हंगामी पैसेवारी ( washim paisewari ) 62 पैशावर.

Washim paisewari 2023 jahir वाशीम खरीप पिकांची हंगामी पैसेवारी 2023 जाहीर.
राज्यात खरीप हंगामातील पीक परिस्थितीची पाहणी करून पैसेवारी काढली जाते. यामध्ये सुरुवातीला ३0 सप्टेंबर हंगामी पैसेवारी Washim paisewari जाहिर केली गेली आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सर्व भागात सारखा पाऊस झाला नाही. पेरण्यांना उशिराने सुरवात झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड व शेवटी सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे आता आणेवारी वर काय परिणाम होतोय याकडे सर्वांचे लक्ष होते.
शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते.
Washim paisewari
यंदाच्या ( 2023 ) खरीप हंगामातील ( hungami paisewari Kharip Season) पिकांची नजर अंदाज आणेवारी / पैसेवारी जिल्हा प्रशासनातर्फे शनिवारी (ता. ३० ) जाहीर करण्यात आली. त्यानुसार वाशिम ( washim Kharip paisewari ) जिल्ह्याची अंतिम पैसेवारी सरासरी 62 पैसे दाखविण्यात आली आहे.
खरीप पिकांची हंगामी पैसेवारी 62 पैसे सरासरी
वाशिम जिल्ह्यात यंदा पिकाखालील क्षेत्र 2 लक्ष 19 हजार 484 हेक्टर आहे. सन 2023 – 24 या वर्षातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी सरासरी 62 पैसे इतकी आहे.
जिल्ह्यात एकूण 793 गावे आहेत.या सर्व गावांची खरीप हंगामाची पैसेवारी करण्यात आली आहे.
यामध्ये वाशिम तालुका – 131, मालेगाव तालुका – 122, रिसोड तालुका – 100, मंगरूळपीर तालुका – 137, कारंजा तालुका – 167 आणि मानोरा तालुका 136 गावांचा समावेश आहे.
खरीप हंगामात पैसेवारी काढण्यात आलेल्या महसूल मंडळाची संख्या 46 इतकी असून यामध्ये वाशिम तालुक्यातील 9, मालेगाव रिसोड व कारंजा तालुक्यातील प्रत्येकी 8 मंडळे मंगरूळपीर तालुका 7 मंडळे आणि मानोरा तालुक्यातील 6 मंडळांचा समावेश आहे
यात वाशीम तालुक्यात एकूण १३१ महसुली गावे आहेत.या सर्व १३१ गावांची
मालेगाव तालुक्यातील १२२ गावे आहे, या १२२ गावांची
रिसोड तालुक्यात १०० महसूली गावे असून या सर्व १०० गावांची हंगामी पैसेवारी 62 पैसे आहे.
मंगरुळपीर तालुक्यात १३७ महसूल गावे असून या सर्व गावांची पैसेवारी 62 पैसे आहे.
कारंजा तालुक्यात एकूण १६७ महसूली गावांची पैसेवारी 62 पैसे.
मानोरा तालुक्यातील सर्व १३६ गावांची पैसेवारी 62 पैसे आहे.
एकूण वाशीम जिल्ह्यातील खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी सरासरी ४62 पैसे इतकी आढळून आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Washim antim paisewari