अतिवृष्टी सह विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित वाशिम जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ( Washim Kharip paisewari ) जाहीर, नुकसान भरपाई सह शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा.

Washim Kharip paisewari 2022 Sudharit
वाशिम जिल्ह्याची आणेवारी ( washim Kharip paisewari ) ४७ टक्के ओल्या दुष्काळाचा परिणाम, उत्पादकता घटली.
जिल्ह्याच्या खरीप पीक हंगाम सन 2022 -23 ची प्रमुख पिकांची सुधारीत पैसेवारी सर्व तहसीलदारांकडुन प्राप्त झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण 793 महसूल गावांची सरासरी पैसेवारी 47 पैसे इतकी आहे.
तालुकानिहाय तालुक्यात समाविष्ठ गावांची संख्या आणि खरीप हंगामात सुधारीत पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी असलेल्या गावांची पैसेवारी पुढीलप्रमाणे आहे.
वाशिम तालुका – 131 गावे,पैसेवारी 47 पैसे,
मालेगाव तालुका -122 गावे, पैसेवारी 48 पैसे,
रिसोड तालुका – 100 गावे,पैसेवारी 46 पैसे,
मंगरुळपीर तालुका – 137 गावे, पैसेवारी 47 पैसे,
कारंजा तालुका – 167 गावे,पैसेवारी 47 पैसे
मानोरा तालुका – 136 गावे,पैसेवारी 47 पैसे अशी आढळून आली आहे.
जिल्ह्यातील 793 गावातील प्रमुख पिकांची काढण्यात आलेली सरासरी सुधारीत पैसेवारी 47 पैसे आहे. या सुधारीत पैसेवारीच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी मान्यता दिली आहे.
राज्यात खरिप पीक परिस्थिती कशा पद्धतीची आहे, पिकांचे नुकसान, घटलेली उत्पादकता याची माहिती दर्शविण्यासाठी आणेवारीचा आधार घेतला जातो.
जर जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्क्याच्या आतमध्ये असेल तर संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त समजला जातो.
जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्के आत असेल तर विविध हा निर्णय उपयोगी पडतो.
कृषिपंपाच्या वीज बिलामध्ये सवलत दिली जाते.
शेतकयांच मुलांच्या शिक्षणाच्या फीमध्ये देखील सवलत असते. शेतसारा भरताना सूट मिळते.