Washim antim paisewari 47 पैसे, प्रतीक्षा मदतीची

जिल्ह्याची खरिप पिकांची पैसेवारी ( washim antim paisewari ) 47 पैशावर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतीक्षा शासन मदतीची.

Washim antim paisewari

Washim antim paisewari 2022 jahir वाशीम खरीप पिकांची 2022 ची अंतिम आणेवारी जाहीर.

राज्यात खरीप हंगामातील पीक परिस्थितीची पाहणी करून पैसेवारी काढली जाते. यामध्ये सुरुवातीला ३० ऑक्टोबरला सुधारित पैसेवारी जाहिर केली गेली होती, मात्र आता शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम पैसेवारी कडे लागले होते.

जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सर्व भागात सारखा पाऊस झाला नाही. पेरण्यांना उशिराने सुरवात झाली. त्यानंतर जून जुलै पावसाचा खंड व शेवटी ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे आता आणेवारी वर काय परिणाम होतोय याकडे सर्वांचे लक्ष होते.

शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते.

यंदाच्या (२०२२) खरीप हंगामातील ( antim paisewari Kharip Season) पिकांची अंतिम आणेवारी / पैसेवारी जिल्हा प्रशासनातर्फे शुक्रवारी (ता. ३० ) जाहीर करण्यात आली. त्यानुसार वाशिम ( washim Kharip paisewari ) जिल्ह्याची अंतिम पैसेवारी सरासरी 47 पैसे दाखविण्यात आली आहे.

जिल्हयाची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे

वाशीम जिल्ह्यात एकूण ७९३ महसूल गावे आहेत. यातील सर्वच ७९३ गावांची खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे.

यात वाशीम तालुक्यात एकूण १३१ महसुली गावे आहेत.या सर्व १३१ गावांची पैसेवारी ४७ पैसे इतकी आहे.

मालेगाव तालुक्यातील १२२ गावे आहे, या १२२ गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.

रिसोड तालुक्यात १०० महसूली गावे असून या सर्व १०० गावांची हंगामी पैसेवारी ४६ पैसे आहे.

मंगरुळपीर तालुक्यात १३७ महसूल गावे असून या सर्व गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.

कारंजा तालुक्यात एकूण १६७ महसूली गावांची पैसेवारी ४७ पैसे.

मानोरा तालुक्यातील सर्व १३६ गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.

एकूण वाशीम जिल्ह्यातील खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे इतकी आढळून आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. नियमित पावसापेक्षा परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे.

यामुळे पैसेवारीही कमी येत आहे. वास्तविक पहाता शेतीचे नुकसान होणे, हा प्रकारच नकारात्मक आहे. यामुळेच पैसेवारी कमी होते, अनुदान व विम्यासाठी ही पैसेवारी योग्य नसल्याचे सांगण्यात येते.

Washim antim paisewari

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: