आता वन्यप्राण्यांच्या हल्यात व्यक्ती वा पशू मृत झाल्यास, जखमी झाल्यास दिल्या जाणाऱ्या मदतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. Vanyaprani nuksan 2022

vanyaprani nuksan Bharpai 2022
महाराष्ट्र राज्यात वन विभाग करीत असलेल्या वन्यजीव संवर्धनामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत लक्षनीय वाढ झालेली आहे.
वनालगत च्या गावातील नागरिकांचे डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेसारख्या ( dr shyama prasad mukherjee jan van yojana ) योजनाद्वारे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे.
मात्र हे सर्व करत असताना सुध्धा सन 2019-2020, 2020 21, 2021 22 या वर्षांमध्ये वन्यजीवांच्या हल्यामुळे ( vanyaprani nuksan ) अनुक्रमे 47, 80 व 86 इतक्या मनुष्यहानीच्या घटना घडल्या आहेत.
मनुष्यहानीच्या वाढत्या घटनांमुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे होणारे अतोनात नुकसान लक्षात घेऊन राज्य शासनाच्या वन विभागामार्फत वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस कोल्हा, मगर, हत्ती, व रान कुत्रे यांच्या हल्ल्यामुळे ( vanyaprani nuksan ) होणारे मनुष्यहानी व पशुधन आणि प्रकरणी देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्याच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या साठी वनविभाग शासन निर्णय हा 23 ऑगस्ट 2022 अन्वये निर्णय घेण्यात आला आहे.
शासन निर्णय येथे पाहा 👇
वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी व पशुधन मृत / अपंग / जखमी झाल्यास द्यावयाचे अर्थसहाय्य मध्ये वाढ करणेबाबत.
या शासन निर्णयानुसार वन्य प्राण्यांच्या हल्यामुळे व्यक्ती मृत झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसाहयात आता रुपये पंधरा लक्ष वरून वीस लक्ष अशी वाढ करण्यात आली आहे.
तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे गाय म्हैस बैल याचा मृत्यू झाल्यास 60000 वरून ही रक्कम 70000 रुपये करण्यात आली आहे.
तसेच मेंढी बकरी व इतर पशुधन याचा मृत्यू झालास दिली जाणारी मदत आता दहा हजार वरून पंधरा हजार करण्यात आली आहे.
याचप्रमाणे म्हैस बैल यांना कायम अपंगत्व आल्यास दिली जाणारी मदत ही बारा हजारावरून 15000 रुपये करण्यात आली आहे.
तसेच काय म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास चार हजार वरून पाच हजार एवढी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. vanyaprani halla madat