SSC 10th Board Exam Result | निकाल उद्या दिनांक 13 मे 2025 रोजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेचा दहावी बोर्ड परीक्षा निकाल उद्या दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर होणार आहे. SSC 10th Board Exam Result

SSC 10th Board Exam Result

SSC 10th Board Exam Result Date Declared

दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे आहे. दहावीची परीक्षा मार्च महिन्यात झाली. त्यानंतर निकाल कधी लागणार असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडला होता.
हाच निकाल आता उद्या 13 मे 2025 रोजी लागणार आहे.

विद्यार्थी आपला निकाल डिजिलॉकर या वेबसाइट किंवा Digi locker App वर जाऊनदेखील डाउनलोड करु शकतात.

यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला डिजिलॉकरवर जाऊन अपार आयडी लॉग इन करायचा आहे.

यानंतर SSC Result असं टाइप करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. सीट नंबरनंतर काही आवश्यक माहिती भरायची आहे. यानंतर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

विद्यार्थी दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने अगदी आपल्या मोबाईलवर देखील पाहू शकतात. यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड वेबसाइट जारी केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.

mahahsscboard.in

mahresult.nic.in

msbshse.co.in

mh-ssc.ac.in

sscboardpune.in

13 मे 2025 रोजी या वेबसाइटवर जाऊन विद्यार्थी आपला रिझल्ट पाहू शकतात. यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट ओपन होईल.

HSC 12 Board Exam Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव देविदास कुलाळ यांनी निकाल जाहीर केला.

या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण 14,97,985 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,97,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची ही टक्केवारी 91.88 आहे. सर्व विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के इतका सर्वाधिक आहे.

कोकण विभागातील बारावीचा निकाल 22,797 (96.74 टक्के), कोल्हापूर विभागातील 1,06,004 (93.64 टक्के), मुंबई विभागातील बारावीचा निकाल 2,91,955 (92.93 टक्के), छत्रपती संभाजीनगर 1,65,961 (92.24 टक्के), अमरावती 1,32,814 (91.43 टक्के), पुणे 2,21,631 (91.32 टक्के), नाशिक 1,44,136 (91.31 टक्के), नागपूर 1,36,805 (90.52 टक्के) आणि लातूर विभागातील 80,770 (89.46 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व विभागीय मंडळांतून 6,76,972 मुले तर 6,25,901 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. नियमित मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 टक्के असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58 टक्के आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी जास्त आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 1,49,932 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, 4,07,438 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 5,80,902 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 1,64,601 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

विज्ञान शाखेतील बारावीचा निकाल 7,15,595 विद्यार्थी (97.35 टक्के), कला शाखेतील बारावीचा निकाल 2,81,606 (80.52 टक्के), वाणिज्य शाखेतील बारावीचा निकाल 2,77,629 (92.68 टक्के), व्यवसाय अभ्यासक्रम 24,450 (83.26 टक्के) तर आयटीआय मधील 3,593 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (82.03 टक्के).

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी / गुणसुधार योजनेअंतर्गत फक्त लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुन:श्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 व जून-जुलै 2026 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस श्रेणीसुधार/ गुणसुधार साठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत आहेत, असे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

HSC 12 Board Exam Result 2025 declared

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येतील.

  1. 1. https://results.digilocker.gov.in

२. https://mahahsscboard.in

३. http://hscresult.mkcl.org

४. https://results.targetpublications.org

५. https://results.navneet.com

६. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results

८. https://www.indiatoday.in/education-today/results

९. https://www.aajtak.in/education/board-exam-results

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १२ वी परीक्षेचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवर पाहता येतील. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्जाची सोय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *