Soyabin vima 2022 अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार २५% वीमा

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार २५% आगाऊ Soyabin vima 2022, खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसुचना अकोला जिल्ह्यासाठी लागू 

Soyabin vima 2022

Soyabin vima 2022 Akola

अकोला जिल्हयातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2022 अंतर्गत प्रतिकुल हवामान परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसुचना लागु करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी, पुर, कीड रोग, पावसाच्या पडलेल्या खंडामुळे सोयाबीनच्या फुलांची गळ तर शेंगा परिपक्व न झाल्याने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन आले होते.

अशा परस्थितीमध्ये जिल्हयातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ अधिसूचना काढण्याबाबत मोठी मागणी केली जात होती.

विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी निमा अरोरा अकोला यांनी ही Soyabin vima 2022 करिता अधिसुचना लागु केली आहे.

अकोला जिल्हयात १ जुलै ते ३०ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी मुळे सोयाबीनचे नुकसान दिसून आल्याने जिल्ह समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना च्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थिती जसे पुर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतुद आहे.

यामध्ये दुष्काळ संहिता 2016 नुसार, पावसातील तीन ते चार आठवड्यापेक्षा जास्त खंड असल्याने, पावसाचे कमी झालेले प्रमाण, तापमानातील असाधारण घट, वाढ, दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 20 टक्के पेक्षा जास्त तफावत, मोठ्या प्रमाणात कीड रोग यांचा पिकावरील प्रादुर्भाव, पीक पेर क्षेत्रांच्या 25% पेक्षा जास्त क्षेत्रावर तीव्र प्रदुरुभाव, इतर नैसर्गिक आपत्तीपूर्व परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या 25% पेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्यास अशा बाबींचा समावेश होतो.

वरील बाबी करिता शासकीय यंत्रणांचा अहवाल पीक परिस्थितीबाबत शास्त्रज्ञानाचे अहवाल वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्र प्रसिद्ध बातमी व प्रत्यक्ष पीक परिस्थितीच्या सर्वेक्षण इत्यादींच्या आधारे, राज्य शासनाचे अधिकारी व विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणेनुसार अपेक्षित उत्पादन हे त्या पिकांच्या मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या 50% पेक्षा कमी असल्याने निर्देशनास आल्यामुळे नुकसान भरपाई पात्र असल्याचे ग्राह्य धरण्यात आले आहे.

या नियमानुसार समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार अकोला जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षीत असल्याने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सोयाबीन या पिकांसाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसूचना लागु केली आहे.

त्यामुळे या अधिसूचने द्वारे शासन निर्णय क्र दिनांक १ जुलै 2022 अन्वये व उपरोक्त संदर्भ क्रमांक चारच्या बैठकीतील चर्चा नुसार व प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार खालील नमूद केलेल्या अधिसूचित पिक विमा क्षेत्रातील सोयाबीन Soyabin vima 2022 या अधिसूचित पिकांसाठी संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम धारक शेतकऱ्यांना देण्यासाठी आयसीआयसीआय लोबार्ड जनरल इन्शुरन्स विमा कंपनी यांना आदेशित करण्यात येत आहे.

नुकसान टक्केवारी Ativrushti nuksan percentile Soyabin vima 2022

अकोला जिल्ह्यातील मंडळ निहाय नुकसान टक्केवारी खालील प्रमाणे असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: