शेतकरी कर्जमाफी पोर्टल सुरू | mjpsky karjmafi portal

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, mjpsky karjmafi portal सुरू.

mjpsky karjmafi portal

Mjpsky karjmafi portal reopened

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेचे पोर्टल सुरू करण्यात आले असून, संबंधित लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत माहिती अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केले आहे.

या योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची व वारसांची माहिती पोर्टलवर तत्काळ अपलोड करावी. याबाबत अग्रणी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच सर्व बँकांना सूचित करण्यात आले आहे, अशी माहिती उपनिबंधक कार्यालयाने दिली.

यामध्ये प्राथमिकदृष्ट्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धीसाठी बँकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या यादीमधील संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या विशिष्ट क्रमांकासह शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरणासाठी जावयाचे आहे.

त्याठिकाणी संगणकावर दिसत असलेल्या कर्जखात्यांचा तपशील, आधार क्रमांक इत्यादी बाबींची खातरजमा करुन शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. आधार प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यामध्ये लाभाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही  करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: