Rashtriya Vayoshri Yojana – काय आहे ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’, अटी , पात्रता व लाभ

जाणून घेऊयात काय आहे ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ ( Rashtriya Vayoshri Yojana ) , अटी , पात्रता व लाभ

Rashtriya Vayoshri Yojana

योजना परिचय – Rashtriya Vayoshri Yojana

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय च्या माध्यमातून २०१७ सुरु करण्यात आलेली राष्ट्रीय वयोश्री योजना ( Rashtriya vayoshri yojana )

‘राष्ट्रीय वयोश्री योजना’  या योजनेद्वारे देशातील दिव्यांग व गरीब वृद्धांना व्हीलचेअर आणि इतर सहाय्यक उपकरणे मोफत दिली जात आहेत. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मदत आणि सहाय्यक जीवन सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप करण्यासाठी केंद्र सरकारची हि एक महत्वाची योजना आहे.

या योजनेअंतर्गत अंतर्गत ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या दैनंदिन जीवनोपयोगी सहाय्यक आणि सहाय्यक उपकरणांचे वितरण केले जात.

राष्ट्रीय वयोश्री योजनेचा उद्देश

समाजातील गरीब घटकातील वृद्धांना जे कोणत्या ना कोणत्या प्रकारे शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत. ज्यांना वाढत्या वयाबरोबर चालताना त्रास होतो, ऐकता येत नाही मात्र आपल्या आर्थिक दुर्बलतेमुळे ते आवश्यक उपकरणे खरेदी करु शकत नाहीत अशा नागरिकांना मदत करणे हा ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ चा  उद्देश आहे.

लाभार्थी पात्रता

  • अर्जदार भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे.
  • केवळ 60 वर्षांवरील लोकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात, यासाठी त्यांना नोंदणी करताना संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • दारिद्र्यरेषेखालील लोकांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो, त्यामुळे नोंदणी करताना लाभार्थ्याकडे बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रं

  1. आधार कार्ड (Aadhar Card)
  2. मोबाइल नंबर (Mobile Number)
  3. पासपोर्ट साइज फोटो (Passport Size Photo)
  4. बीपीएल प्रमाण पत्र (BPL card )
  5. शारीरिक अक्षमतेचे प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय अहवाल
  6. जर अर्जदार वृद्धापकाळ निवृत्तीवेतन घेत असेल, तर त्याची प्रत
  7. ओळखपत्र, शिधापत्रिका / पासपोर्ट / वाहन चालविण्याचा परवाना

या योजनेंतर्गत, ६० वर्षांवरील वृद्धांना दिली जाणारी उपकरण

  1. वॉकिंग स्टिक
  2. स्पेक्टल्स (चश्मा)
  3. श्रवण यंत्र (सुननें की मशीन)
  4. व्हील चेयर Wheelchairs, Wheel Chairs with Commode
  5. एल्बो कक्रचेस
  6. ट्राइपॉड्स
  7. क्वैडपोड
  8. कृत्रि मडेंचर्स
  9. Walker/Rollator with Brakes
  10. Foot Care Kit

https://www.alimco.in/content/3_1_Products.aspx

या योजनेंतर्गत सरकारतर्फे शिबिर आयोजित केली जातात व यात डॉक्टर या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व लोकांची तपासणी करून तपासणीनंतर पात्र व्यक्तीला कृत्रिम उपकरणे दिली जातात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी न्याय आणि समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

Click here for Online application

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: