राज्यात Pocra 2 प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विदर्भातील जिल्हयांचा समावेश

राज्यात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विदर्भातील जिल्हयांचा समावेश Pocra 2.0

Pocra 2

Pocra 2 नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-2 कार्यान्वित करण्यासाठी विविध बाबींना मान्यता

Village List PDF pocra 2 village list

GR 16.06.2025

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन

05 June 2025 GR- सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, टप्पा-2 साठी रू.23,88,41,000/- इतका निधी वितरित करण्याबाबत.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करून, त्यामध्ये विदर्भातील ऊर्वरित पाच जिल्हयांमध्ये हा प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या दुसऱ्या टप्प्यासाठी ६ हजार कोटी रुपये खर्च येईल.

या प्रकल्पास डॉलर्स विनिमय दरामधील फरकामुळे अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यास देखील मान्यता देण्यात आली. आता या प्रकल्पाचा खर्च ५ हजार ४६९ कोटी रुपये इतका होणार आहे. या प्रकल्पाच्या ४ हजार कोटींच्या मुळ किंमतीमध्ये डॉलर्सच्या वाढत्या दरामुळे ६९० कोटी रुपये वाढ झाली आहे. यातील ४८३ कोटी रुपये जागतिक बँकेकडून मिळणार आहेत. तसेच उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७७९ कोटी रुपये असा १ हजार ४६९ कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येईल. यासाठी कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गाव निवड समिती स्थापन करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील ४ हजार ६८२ गावे, जळगाव जिल्ह्यातील ४६० गावे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील १४२ अशा एकूण ५ हजार २२० गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *