किसान सन्मान निधी ( pm kisan ) योजनेचा पुढील हप्ता मिळविण्यासाठी शेवटची संधी, करा तात्काळ हे काम – PMkisan ekyc 2022

PMkisan ekyc last date 2022
शेतकरी लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्राच्या माध्यमातून ई-केवायसी पडताळणी पुर्ण करन्याच शासनाचं आवाहन.
राज्यात दिनांक 12 नोव्हेंबर, 2022 अखेर एकुण 1 कोटी 9 लाख लाभार्थ्या पैकी 91.33 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी ( pm kisan KYC) पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे.
मात्र बीड, सोलापूर सह सांगली जिल्ह्यातील लाखो शेतकरी अद्याप देखील kyc न केलेले आहेत, हे शेतकरी मात्र अपात्र होणार आहेत.
Pmkisan ekyc न झालेल्या शेतकऱ्यांची जिल्हा निहाय संख्या खालीलप्रमाणे.
- रायगड 13209
- वाशिम 19637
- भंडारा 28792
- गडचिरोली 21420
- सातारा 64206
- गोंदिया 35730
- नाशिक 65929
- चंद्रपूर 42318
- लातूर 48881
- उस्मानाबाद 44406
- जळगाव 43039
- वर्धा 26577
- हिंगोली 33337,
- अहमदनगर 1,13,363
- नंदुरबार 22044
- परभणी 59638
- नांदेड 86405
- कोल्हापूर 94716
- औरंगाबाद 79051
- सिंधुदुर्ग 29738
- अमरावती 65220
- बुलढाणा 79032
- पुणे 105388
- रत्नागिरी 38000
- धुळे 42087
- यवतमाळ 74808
- जालना 80377
- अकोला 52606
- पालघर 27136
- सांगली 117158
- नागपूर 51427
- सोलापूर 173447
- बीड 140500
- ठाणे 52198
- एकूण 21,02,908
या उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्र ( CSC centre ) च्या माध्यमातून त्यांचे ई-केवायसी ( pmkisan eKYC ) पडताळणी पुर्ण अशे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान pm kisan sanman nidhi yojana ) योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास ( पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रुपये 2 हजार प्रती हप्ता या प्रमाणे तिसऱ्या हप्त्यात रू. 6 हजार प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट ( डिबीटीद्वारे DBT ) जमा करण्यात येत आहे.
या पात्र शेतकरी लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा साठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान PM Kisan sanman nidhi yojana ) योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचे ई-केवायसी ( PMkisan e-KYC verification) पडताळणी पूर्ण करण्याचे ( pmkisan EKYC last date ) निर्देश दिले आहेत.
सदरची ई-केवायसी (e-KYC) पडताळणी पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच पी.एम.किसान योजनेचा पुढचा हप्ता वितरीत करण्यात येणार असल्याचे केंद्र शासनाचे निर्देश आहेत.
यासाठी लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर ( pm kisan portal ) https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्र सीएससी (CSC) मार्फत ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करता येईल.
पीएम किसान पोर्टलवरील https://pmkisan.gov.in/ या लिंकद्वारे ई-केवायसी (e-KYC) करतांना लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या OTP आधारे स्वत:चे ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करता येईल.
यासाठी कोणतीही फी आकारणी केली जाणार नाही. तसेच सामाईक सुविधा केंद्र (CSC) मध्ये जाऊन लाभार्थी बायोमॅट्रिक (biometric) पद्धतीद्वारे ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करून घेऊ शकतात. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम रूपये 15/- प्रती लाभार्थी फी आकारणी करण्यात येते
तर उशीर न करता तात्काळ करा आपली KYC.