किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता ( pmkisan 14th installment ) मिळविण्यासाठी शेवटची संधी, करा तात्काळ हे काम

pmkisan 14th installment ekyc last date 2023
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा पोस्टात उपलब्ध
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास 2 हजार रुपये हप्त्याप्रमाणे प्रती वर्षी 6 हजार रुपये लाभ देण्यात येतो. या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट ऑफीसात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या योजनेअंतर्गत 14 व्या हप्त्याचा लाभ माहे मे किंवा जून मध्ये जमा होणार असून केंद्र शासनाने 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. राज्यात सद्यस्थितीत 12 लाख 91 हजार लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.
यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक इत्यादीच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडीया पोस्ट पेमेंट बँकत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासात जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थीना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही.
पी.एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थीची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून तो आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थीना संपर्क करून आयपीपीबी मध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबी मार्फत 15 मे 2023 पर्यंत गाव पातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे.
आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषी आयुक्त श्री. चव्हाण यांनी केले आहे.
शेतकरी लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्राच्या माध्यमातून ई-केवायसी पडताळणी पुर्ण करन्याच शासनाचं आवाहन.
राज्यात दिनांक 12 नोव्हेंबर, 2022 अखेर एकुण 1 कोटी 9 लाख लाभार्थ्या पैकी 91.33 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी ( pm kisan KYC) पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे.
मात्र बीड, सोलापूर सह सांगली जिल्ह्यातील लाखो शेतकरी अद्याप देखील kyc न केलेले आहेत, हे शेतकरी मात्र अपात्र होणार आहेत.
Pmkisan ekyc न झालेल्या शेतकऱ्यांची जिल्हा निहाय संख्या खालीलप्रमाणे.
- रायगड 13209
- वाशिम 19637
- भंडारा 28792
- गडचिरोली 21420
- सातारा 64206
- गोंदिया 35730
- नाशिक 65929
- चंद्रपूर 42318
- लातूर 48881
- उस्मानाबाद 44406
- जळगाव 43039
- वर्धा 26577
- हिंगोली 33337,
- अहमदनगर 1,13,363
- नंदुरबार 22044
- परभणी 59638
- नांदेड 86405
- कोल्हापूर 94716
- औरंगाबाद 79051
- सिंधुदुर्ग 29738
- अमरावती 65220
- बुलढाणा 79032
- पुणे 105388
- रत्नागिरी 38000
- धुळे 42087
- यवतमाळ 74808
- जालना 80377
- अकोला 52606
- पालघर 27136
- सांगली 117158
- नागपूर 51427
- सोलापूर 173447
- बीड 140500
- ठाणे 52198
- एकूण 21,02,908
या उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्र ( CSC centre ) च्या माध्यमातून त्यांचे ई-केवायसी ( pmkisan eKYC ) पडताळणी पुर्ण अशे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान pm kisan sanman nidhi yojana ) योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास ( पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रुपये 2 हजार प्रती हप्ता या प्रमाणे तिसऱ्या हप्त्यात रू. 6 हजार प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट ( डिबीटीद्वारे DBT ) जमा करण्यात येत आहे.
या पात्र शेतकरी लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा साठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान PM Kisan sanman nidhi yojana ) योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचे ई-केवायसी ( PMkisan e-KYC verification) पडताळणी पूर्ण करण्याचे ( pmkisan EKYC last date ) निर्देश दिले आहेत.
सदरची ई-केवायसी (e-KYC) पडताळणी पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच पी.एम.किसान योजनेचा पुढचा हप्ता वितरीत करण्यात येणार असल्याचे केंद्र शासनाचे निर्देश आहेत.
यासाठी लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर ( pm kisan portal ) https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्र सीएससी (CSC) मार्फत ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करता येईल.
पीएम किसान पोर्टलवरील https://pmkisan.gov.in/ या लिंकद्वारे ई-केवायसी (e-KYC) करतांना लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या OTP आधारे स्वत:चे ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करता येईल.
यासाठी कोणतीही फी आकारणी केली जाणार नाही. तसेच सामाईक सुविधा केंद्र (CSC) मध्ये जाऊन लाभार्थी बायोमॅट्रिक (biometric) पद्धतीद्वारे ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करून घेऊ शकतात. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम रूपये 15/- प्रती लाभार्थी फी आकारणी करण्यात येते
तर उशीर न करता तात्काळ करा आपली KYC.