कसा आहे नेमका कुसुम सोलर पंप योजनेचा कोठा | pm kusum solar pump

जाणून घेऊयात नेमका कसा आहे कुसुम सोलर पंप ( PM Kusum Solar yojana ) योजनेचा प्रवर्गनिहाय व HP निहाय कोठा.

PM kusum

PM Kusum Solar pump yojana maharashtra 2022

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी सौर कृषी पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता करून देण्यासाठी देशांमध्ये कुसुम सोलर पंप ( pm kusum solar pump yojana ) योजना राबवली जात आहे.

या योजनेच्या अंतर्गत येत्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये पाच लाख सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, तर याचअंतर्गत २०२२-२३ या वर्षामध्ये १लाख सौर कृषी पंप दिले जाणार आहेत.

For more detail watch this 👉

केंद्र शासनाच्या माध्यमातून 30% निधी, राज्य शासनाच्या माध्यमातून 30 % निधी, इतर स्त्रोताच्या माध्यमातून 30% निधी तसेच १०% लाभार्थी हिस्सा अशा निधीच्या प्रमाणामध्ये ही योजना राबवली जात आहे.

राज्यात या योजनेच्या अंतर्गत पहिला टप्पा 2750 पंप पूर्ण झाला असून आता टप्पा २ च्या माध्यमातून 50,000 पंपाचे वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आलेलीआहे.

या पन्नास हजाराच्या टप्प्यानंतर पुढे 50000 पंप लावून 2022 मध्ये साधारणपणे राज्यांमध्ये एक लाख सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या योजनेकडे शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात ओडा आहे. यामुळे अर्ज सुरू झाल्यानंतर तात्काळ काही तासांमध्ये या योजनेचे अर्ज पूर्ण होतात, कोटा पूर्ण होतो.

त्याच्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा गैरसमज निर्माण झालेला दिसत आहे.

हा गैरसमज दूर करण्यासाठी आज हा नेमका 1,00,000 सोलर कृषी पंपाचा कोटा कशाप्रकारे दिला जातोय, 3 एचपी चे जनरल प्रवर्गासाठी, एस सी साठी, एसटी साठी किती पंप दिले जातील, 5HP Solar pump किती दिले जातील 7.5 HP किती दिले जातील हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

PM kusum solar pump yojana Quota

3 HP Qouta

3HP च्या कॅटेगरीत एक लाख पंपा पैकी 60 हजार सौर कृषी पंप दिले जाणार आहेत.

सर्वसाधारण प्रवर्ग 46,500

अनुसुचित जाती 8,100

अनुसुचित जमाती 5,400

5 HP Qouta

5HP च्या कॅटेगरीत एक लाख पंपा पैकी 30 हजार सौर कृषी पंप दिले जाणार आहेत.

सर्वसाधारण प्रवर्ग 23,250

अनुसुचित जाती 4,050

अनुसुचित जमाती 2,700

7.5 HP Qouta

7.5HP च्या कॅटेगरीत एक लाख पंपा पैकी 10 हजार सौर कृषी पंप दिले जाणार आहेत.

सर्वसाधारण प्रवर्ग 7,750

अनुसुचित जाती 1,350

अनुसुचित जमाती 900

3, 5, 7.5HP या तिन्ही कॅटेगरी मिळून एक लाख सौर कृषी पंप दिले जाणार आहेत.

सर्वसाधारण प्रवर्ग 77,500

अनुसुचित जाती 13,500

अनुसुचित जमाती 9,000

pm kusm
pm kusum 2022 QUOTA

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: