PM kisan ekyc 2022 – का, कशी व कधी करायची kyc याबद्दल सविस्तर माहिती या लेखात घेणार आहोत.

शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये अर्थसाहाय्य देणारी महत्वाची योजना म्हणजे pm kisan sanman nidhi yojana. मात्र योजनेला बोगस लाभार्थ्यांचे ग्रहण लागले आहे, योग्य त्या पात्र शेतकऱ्याच्या हातात या किसान सन्मान निधीचे हप्ते पोचत नाहीत यासाठी आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बायोमेट्रिक द्वारे लाभार्थी वेरिफिकेशन पार पाडले जात आहे
Table of Contents
PM kisan ekyc का करायची ?
किसान सन्मान निधी योजने मधील पात्र लाभार्थी शेतकरी हयात आहेत का ? किंवा मयत आहे ? याच्या चौकशी साठी केली जात आहे.
यामुळे kyc करून आपण हयात आहोत हे सिद्ध होते.
Pm kisan ekyc मुळे शेतकऱ्याच्या नावाने बोगस दुसरेच कोणी लाभ घेत नाही. या सर्व बाबींची खातरजमा करण्यासाठी ही Ekyc केली जात आहे.
PM kisan ekyc कशी करायची ?
PN kisan ekyc करण्याससाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.
१) बायोमेट्रिक.-
जर शेतकऱ्याच्या आधार कार्डला मोबाइल क्रमांक जोडलेला नसेल त्यावेळीEkyc साठी ही पद्धत वापरतात. या आपल्याला जवळच्या CSC केंद्रावर वर जाऊन आपल्या हाताच्या ठशाने Ekyc करता येते.
२) आधार OTP –
जर शेतकऱ्याच्या आधार कार्डला मोबाइल क्रमांक जोडलेला असेल तर या प्रकाराने pm kisan ekyc करता येते. या शेतकरी स्वतः आपल्या मोबाईल मधून किंवा CSC सेंटर, नेट कफे वर जाऊन Ekyc करू शकतात.
ज्यामध्ये शेतकऱ्याला मोबाईल नंबर वर एक OTP पाठविला जातो व तो वेरिफाय केल्यानंतर आधार संलग्न नंबर वर एक OTP पाठविला जातो, हे दोन्ही OTP वेरिफाय केल्यास pm kisan kyc पूर्ण होते.
किसान सन्मान निधी KYC साठी आवश्यक कागदपत्रे
किसान सन्मान निधीच्या kyc करिता otp द्वारे करत असाल तर शेतकरयांना आधार कार्ड, आधार कार्डला जोडलेला स्वतचा मोबाईल नंबर फक्त याच गोष्टी लागतात, तर बायोमेट्रिक द्वारे CSC center वर करत असाल तर आधार नंबर सह स्वतः लाभार्थी शेतकरी उपस्थित असावा लागतो.
अंतिम तारीख
Pm kisan ekyc साठी अंतिम मुदत ही १४ सप्टेंबर २०२२ आहे.
तर या महत्वपूर्ण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी विहित मुदतीत ही kyc ची सोप्पी प्रक्रिया पार पाडा.
हे ही पहा