PM kisan 16th installment  खात्यात येणार ₹६०००

PM kisan 16th installment चे वितरण 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

PM kisan 16th installment

PM kisan samnan nidhi yojana

देशातील गोर गरीब शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये अर्थ सहहाय देणारी एक महत्वाची योजना. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना २००० रुपयांच्या हप्त्याचा लाभ देत असतात अनेक बोगस लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.

या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या १६ व्या हप्त्याच वितरण २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

पी.एम. किसान सन्मान निधी योजनेच्या माहे डिसेंबर 2023 ते मार्च 2024 कालावधीतील 16 वा हप्ता  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार, दि 28 फेब्रुवारी, 2024 रोजी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून रू. 4000/ असा एकुण रू. 6000/ चा लाभ दि. 28 फेब्रुवारी, 2024 च्या समारंभात राज्यातील सुमारे 88.00 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने दि. 28 फेब्रुवारी, 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.

या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  अजित पवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेअंतर्गत दि. 24 फेब्रुवारी, 2024 अखेर राज्यातील 113.60 लाख शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये रू. 27638 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

समारंभास शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष व ऑनलाईन पदधतीने सहभागी व्हावे – कृषीमंत्री धनंजय मुंडे

हा समारंभ केंद्र शासनाचा कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यांनी एकत्रित राबविण्याचे नियोजन केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभही प्रधानमंत्री यांच्या हस्ते या समारंभात वितरीत होणार आहे. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे.

याच बरोबर अनेक शेतकऱ्यांची बँक खाती चुकीची जोडली गेलेली आहेत, राज्यात काही बँकांचे विलीनीकरण किंव्हा ईतर कारणाने IFSC code बदलले आहेत, परिणामी या शेतकऱ्यांना किसान निधी योजनेचा लाभ ही मिळत नाही. त्यांचे हप्ते त्यांच्या खात्यात जमा होत नाहीत.

हे ही पहा

PMkisan kyc का, कशासाठी, कशी करायची

PM kisan लाभार्थी आधार प्रामाणिकरण

याच बरोबर केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( Kisan sanman nidhi yojana) योजनेंतर्गत सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, 2022 नंतर जमा होणारे सर्व हप्ते हे आधार संलग्न बँक खात्यात अदा करन्यात येणार आहेत.

यासाठी सर्व लाभार्थ्यांनी बँक खाती तात्काळ आधार संलग्न करावेत, असे निर्देश राज्याच्या कृषि आयुक्तांनी दिलेले आहेत.

याच बरोबर ज्या लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी आधार लिंक नसल्यास अशा या योजनेच्या लाभार्थ्यांना नंतरचे हप्ते अदा होणार नाहीत.

त्यामुळे राज्यात एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रत्येक जिल्हा अग्रणी बँकेच्या समन्वयाने राज्यात शिबिराचे (कॅम्प) आयोजन करुन प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी आधार लिंक करण्याचे काम अशा सूचना ही सबंधित यंत्रणांना शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या.


kcc vatap

3 thoughts on “PM kisan 16th installment  खात्यात येणार ₹६०००”

  1. बलभीम सगर

    कोन कोन पात्र आहेत या योजने मधे कसे माहिती होनार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: