राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना खात्यावर थेट रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार. Pikvima 2025

Pikvima Update 2025
राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. २५५५ कोटी विमा नुकसानभरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रु. २८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून, नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले.
27.03.2025 GR
सर्वसमावेशक पिक विमा योजने अंतर्गत, खरीप हंगाम 2024 करिता उर्वरीत शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदानासाठी रु.13,41,65,676/- वितरीत करण्याबाबत..
सर्वसमावेशक पिक विमा योजनेअंतर्गत, खरीप २०२३ मधील 80:110 मॉडेलनुसार, राज्य शासनाने 110 पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची, भारतीय कृषि विमा कंपनीला अदा करावयाची, दायित्व रक्कम रु.१८१,०६,९९,२७९/- वितरीत करण्याबाबत.
सर्वसमावेशक पिक विमा योजनेअंतर्गत, रब्बी हंगाम २०२३-24 मधील 80:110 मॉडेलनुसार, राज्य शासनाने 110 पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची, भारतीय कृषि विमा कंपनीला अदा करावयाची, दायित्व रक्कम रु.63,14,67,780/- वितरीत करण्याबाबत..
प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप 2022 व रब्बी 2022-23 मधील 80:110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110 पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषि विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम रु.2,87,63,075/- वितरीत करण्याबाबत.
सर्वसमावेशक पिक विमा योजने अंतर्गत, खरीप 2023 व रब्बी हंगाम 2023-24 मधील, विमा कंपन्यांकडून राज्य शासनास प्राप्त होणारी अपेक्षित परतावा रक्कम, तसेच, खरीप 2023 मधील नाकारलेल्या अर्जांचा जमा शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम समायोजित करण्यास मान्यता देण्याबाबत..
सर्वसमावेशक पिक विमा योजनेअंतर्गत, रब्बी हंगाम २०२4-25 साठी, राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अग्रीम रक्कम रु.४१७,३६,१९,७०९/- इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पिक विमा कंपन्यांना वितरीत करण्याबाबत.
सर्वसमावेशक पिक विमा योजनेअंतर्गत, रब्बी हंगाम २०२4-25 साठी, शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम रु.375,78,39,762/-इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पिक विमा कंपन्यांना वितरीत करण्याबाबत.