पावसाचा खंड, ही मंडळ पिकविम्यासाठी पात्र | Parbhani Pik vima 2022

Parbhani pik vima

पावसाच्या खंडा मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा, परभणी जिल्हा ( Parbhani Pik vima ) अधिसूचना निर्गमित.

Parbhani pik vima

Parbhani pik vima update 2022

राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी, तर काही भागात पावसाचा खंड पडला होता. यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

परभणी जिल्हयात ही अशीच काही परिस्थिती निर्माण झाली होती, जुलै च्या पावसानंतर ऑगस्ट महिन्यात २१ दिवस पावसाचा खंड पडला. त्यामुळे सोयाबीनच्या संभाव्य नुकसान भरपाई साठी प्रधानमंत्री पीक योजनेच्या निकषानुसार जिल्हाधिाऱ्यांमार्फत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

या अधिसूचनेनुसार नुकसान ग्रस्त पात्र मंडळातील शेतकऱ्यांना मंजूर रकमेच्या २५% रक्कम पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी आयसीआयसीआय लोबार्ड जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला आदेशित करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना दिली जाणारी २५% रक्कम अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत ( prabhani pik vima )शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी विमा कंपनीला दिले आहेत.

या अधिसूचनेनुसार परभणी जिल्ह्यातील एकूण 52 महसूल मंडळ पैकी फक्त आठ मंडळातील शेतकऱ्यांना प्रधान पीक विमा योजना अंतर्गत 25% अग्रिम रक्कम मिळणार आहे.

सतत 21 दिवस पावसाचा खंड झाल्याने परभणी जिल्ह्यातील आठ मंडळात 52 ते 57 % पर्यंत सरासरी उत्पादनाच्या तुलनेत घट आली आहे.

यामध्ये परभणी तालुक्यातील झरी, शिंगणापूर, जांब तर गंगाखेड तालुक्यातील माखणी, पूर्णा तालुक्यातील चुडावा, मानवत तालुक्यातील रामपुरी, सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ, तर जिंतूर तालुक्यातील दुधगाव या महसूल मंडळाचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.

%d bloggers like this: