अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना ( Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana 2022 )साठी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन.

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana 2022
पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना ( Swayam yojana 2022 ) अंतर्गत दि.३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागविले.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना ( Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana 2022 )राबविण्यात येत आहे.
या योजनेद्वारे इयत्ता १२ वी नंतर दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमासाठी तसेच महानगरपालिका, विभागीयस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तरापासुन पाच कि.मी. परिसरामध्ये स्थापित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो.
त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी (२०२२-२३) पात्र विद्यार्थ्यांकडून दि.३१ ऑक्टोंबर पर्यंत ऑनलाईन दस्तऐवज अपलोड करुन अर्ज मागविण्यात आले आहेत.
Swayam Yojana 2022 ऑनलाईन भरलेला अर्ज व अपलोड केलेले दस्ताऐवज ऑफलाईन कॉलेज मार्फत कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.
Swayam Yojana 2022 अटी व शर्ती
विद्यार्थी/ विद्यार्थिनी हे अनुसूचित जमाताचे असावे,
जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाखाचे आत असणे आवश्यक.
विद्यार्थ्याचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते असणे बंधनकारक आहे व खाते आधार कार्डशी सलंग्न असावे.
विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी असेल अशा शहरात विद्यार्थ्याचेपालक रहिवासी नसावेत.
विद्यार्थी इ. १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ७ वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल.
विद्यार्थ्याचे कमाल वय २८ वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्याची संस्थेमधील / महाविद्यालयातील उपस्थिती ८० टक्के पेक्षा अधिक असणे आवश्यक.
महाविद्यालयाने विद्यार्थ्याने भरलेला ऑनलाईन अर्ज विहित दस्ताऐवजांची पडताळणी करून ऑनलाईन व हार्डकॉपी प्रकल्प अधिकारी कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील.
केंद्र शासनाच्या पोस्ट बेसिक मॅट्रीक शिष्यवृतीकरीता निश्चीत करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेतंर्गत लाभ देण्यात येईल.
दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. विद्यार्थ्याने त्याचे स्वयंघोषणापत्र व वडीलांचे घोषणापत्र ऑनलाईन व हार्डकापी सादर करणे बंधनकारक राहील.
या योजनेमध्ये विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी फसवणुक केल्याचे आढळल्यास संबंधीत विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशिर कारवाईस पात्र राहील.
तरी पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आधी ऑनलाईन व नंतर ऑफलाईन पद्धतीने आपापल्या महाविद्यालयात सादर करावे, असे आवाहन आदिवासी विकास विभागाने केले आहे.