शेतकऱ्यांना सुलभरित्या पिक कर्ज मिळावीत यासाठी ऑनलाईन पिक कर्ज मागणी अर्ज सुरू ( online crop loan application jalna ) करण्यात आले आहेत.

ऑनलाईन पिक कर्ज मागणी online crop loan Application 2022
शेतकऱ्यांना २०२२-२३ मध्ये पीक कर्ज वाटप होत असताना अतिशय अल्प प्रमाणात पीक कर्ज वाटप झालेले कुठल्याही जिल्ह्याने निश्चित केलेले लक्षांक पूर्ण केलेले नाहीत.
शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत वारंवार आढावा बैठका होतात मात्र बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले जात नाही. केले तर खूप अल्प प्रमाणात पीक कर्ज वाटप केले जाते, बॅंका लवकर कर्ज देत नाहीत या प्रकारच्या तक्रारी आढावा बैठकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात.
आपण जर पाहिलं तर 2021 22 मध्ये जवळजवळ सर्वच जिल्ह्यांच्या माध्यमातून ऑनलाईन ( Online crop loan magni ) पद्धतीने पीक कर्जासाठी अर्ज भरून घेतले होते. आणि 2022 मध्ये सुद्धा हीच प्रक्रिया राबवली जाईल अशा प्रकारची सर्व शेतकरी वर्गाला अपेक्षा होती मात्र जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या पद्धतीला गांभीर्याने घेतलं नाही.
काही तुरळक जिल्ह्यामध्ये हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्यात आले होते ज्यात परभणी जिल्ह्यासाठी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सुरु झाले होते
आणि आज जालना जिल्ह्याचे सुद्धा ऑनलाइन पद्धतीने पीक कर्जासाठी अर्ज (online pik karj magni )सुरू झाले आहेत.
जालना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीककर्ज सुलभतेने मिळावे यासाठी एक नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून याचा शुभारंभ आज १३ जून रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.
या उद्धघाटण प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण,जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आशुतोष देशमुख यांची उपस्थिती होती.
खरीप हंगाम 2022-23 साठी जिल्ह्यातील विविध बँकांमार्फत पीककर्ज वाटप सुरू आहे. पीककर्ज वाटपासाठी गर्दीचे नियमन होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून गुगल लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज भरून पीक कर्ज मागणी नोंदविण्यात आलेली होती.
या लिंकवर 10 जून, 2022 पर्यंत 15 हजार 42 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे.
आणि आता प्रशासनाच्या माध्यमातून jalna.cropsloan.com या नावाने नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.
यापूर्वी गुगल लिंक वर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मार्फत संबंधित बँक शाखांकडे पाठविण्यात आल्या असून गुगल लिंकद्वारे पीककर्ज नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या नव्याने सुरू करण्यात आलेल्या पोर्टल वर नोंदणी करण्याची गरज नाही.
सॉफ्टवेअरची लिंक 👇
Website For Crop Loan Demand Registration
या संकेतस्थळावरिल लिंकद्वारे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या सॉफ्टवेअरमधून थेट संबंधित बँकेकडे कार्यवाही साठी उपलब्ध होणार आहेत.
सॉफ्टवेअरमध्ये ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर सात दिवसाच्या आत शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेत आवश्यक कागदपत्रांसह भेट द्यावी लागेल.
शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे पुढील कागदपत्रे घेऊन बँकेमध्ये बोलावलं जाईल आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पात्र झालेल्या शेतकऱ्यांना ठरलेल्या दरानुसार,निकषानुसार पिक कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे.
या नवीन विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणाली मुळे शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होणार आहे.
बाकी जिल्ह्यातही अशाच पद्धतीने pik karj yojana maharashtra 2022 ऑनलाईन पद्धतीने सुरू केल्यास इतर जिल्ह्यांमध्ये ही शेतकऱ्यांना वाटप होणाऱ्या पीक कर्ज प्रमाणात वाढ होईल.