obc karj yojana 2023 करिता अर्ज सुरू I OBC loan Scheme Maharashtra

OBC Mahamandal obc karj yojana 2023 करिता अर्ज सुरू

obc karj yojana 2023

इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना obc karj yojana 2023 करिता अर्ज सुरू

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी स्वयंम उद्योगासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व कुशल व्यवसाईक व्यक्तीना कृषी सलग्न व पारंपारिक उपक्रम व लघु उद्योग व मध्यम उद्योग उत्पादन, व्यापार विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.

या महामंडळाकडून सन 2023 या आर्थिक वर्षासाठी मुख्यालय स्तरावरुन एक लाख रुपयापर्यंतच्या थेट कर्ज , 20 टक्के बीज भांडवल कर्ज , वैयक्तिक कर्ज व्याज परतावा , गट कर्ज व्याज परतावा , शैक्षणिक कर्ज व्याज परतावा obc karj yojana 2023 योजनेसाठी उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. इतर मागासवर्गीय समाजातील जास्तीत जास्त व्यक्तीने घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

महामंडळा मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना obc karj yojana 2023

रु.१.०० लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना

एक लाख रुपयापर्यंतच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर किमान 500 पेक्षा जास्त असावा

अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असावे.

परतफेडीचा कालावधी 48 समान मासिक हत्यांमध्ये राहील. नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्याना या योजनेत व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकित झालेल्या हप्त्यांवर दर साल दर शेकडा 4 टक्के व्याजदर आकरण्यात येणार आहे.

कर्ज रक्कमेचा पहिला हप्ता रु.75,000/- इतका असतो.दुसरा हप्ता (25% रक्कम) रु.25,000/- प्रत्यक्ष उद्योग सुरु झाल्यानंतर साधारणत: तीन महिन्यांनंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार देण्यात येतो.

अर्जदार लाभार्थीची पात्रता ( Eligibility for msobcfdc loan scheme )

  • लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
  • त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
  • अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान ५०० इतका असावा.
  • अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.1.00 लाखापेक्षा जास्त नसावे. ( सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रानुसार )
  • एकावेळी कुटूंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल.
  • शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय / निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरुण मुले / मुली यांना प्राधान्य.
  • अर्जदाराने आधार कार्ड संलग्न बँक खात्याचा तपशील सादर करावा. ( AADHAR link bank account )
  • अर्जदार महामंडळाच्या कोणत्याही (केंद्र व राज्य) योजनेचा, बँकेचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा. ( experience certificate )

आवश्यक कागदपत्र obc loan scheme

  • शिधा पत्रिकेची प्रमाणित प्रत, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो
  • व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा.
  • जन्मतारखेचा दाखला.
  • आठ वर्षे सेवा शिल्लक असलेल्या दोन जामिनदारांची हमीपत्रे अथवा शेतीचे गहाणखत तसेच दोन्ही पर्यायातील जामिनदारांचे जामिनदार राहणार असल्याबाबतचे संमतीपत्र.
  • स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत “ ना हरकत प्रमाणपत्र ” तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे, त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र
  • तांत्रिक व्यवसायाकरीता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स.
  • व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादींचे दरपत्रक.

20 % बीज भांडवल कर्ज योजना

राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येते. 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजनेमध्ये 75 % रक्कम ही बँकेची असून त्यावरील व्याज हे बँकेच्या नियमाप्रमाणे राहील. 20 % रक्कम ही महामंडळची असून त्यावर दर साल दर शेकडा 6 % व्याज आकारण्यात येते व यामध्ये लाभार्थ्याचा सहभाग 5 टक्के आहे. या योजनेची कर्ज मर्यादा 5 लाख रुपयापर्यंत असून परतफेडीचा कालावधी पाच वर्षाचा समान 60 हप्त्याचा आहे.

अर्जदार लाभार्थीची पात्रता ( Eligibility for msobcfdc loan scheme )

  • लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा.
  • महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
  • लाभार्थीचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
  • अर्जदार कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,०००/- पेक्षा कमी असावे.
  • कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.

आवश्यक कागदपत्र obc loan scheme

  • उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने तो प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती.
  • जातीचे प्रमाणपत्र,
  • शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा
  • शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला.
  • आठ वर्षे सेवा शिल्लक असलेल्या दोन जामिनदारांची हमीपत्रे अथवा शेतीचे गहाणखत तसेच दोन्ही पर्यायातील जामिनदारांचे जामिनदार राहणार असल्याबाबतचे संमतीपत्र.
  • स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत “ना हरकत प्रमाणपत्र” तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे, त्या प्रयोजनासाठीच त्याचा उपयोग करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र.
  • तांत्रिक व्यवसायाकरीता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 10 लाख रुपये पर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. या योजनेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयाच्या मर्यादेत आहे.

कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम 12 टक्केच्या मर्यादेत व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

तसेच लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना

गट कर्ज व्याज परतावा योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 10 लक्ष ते 50 लक्ष रुपयापर्यतची आहे.

या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. गटातील लाभार्थीचे वय 18 ते 45 वर्षे असावे. तसेच गटातील लाभार्थ्यांनी यापूर्वी महामंडळाचा किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच इतर मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट. भागीदार संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीसाठी जे कर्ज दिले जाईल. त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा देशांतर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी कर्ज मर्यादा 10 लक्ष ते 20 लक्ष रुपये पर्यंतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे वय 17 वे 30 वर्षे असावे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लक्ष रुपयाच्या मर्यादेत असावे. विद्यार्थी 12 वीमध्ये 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

लाभार्थ्याने महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत.

तसेच या योजनेचा लाभ हा इतर मागासवर्गीय समाजातील जास्तीत जास्त व्यक्तीने घ्यावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय वर संपर्क साधावा.

असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. ( MAHARASHTRA STATE OBC FINANCE & DEVELOPMENT CORPORATION LTD ) यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

watch this also

VJNT LOAN SCHEME 2022

LASDC Loan Scheme

Lidcom Loan Scheme 2022


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: