Nuksan Bharpai GR 2025 आता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, जे शेतकरी फार्मर आयडी काढणार नाहीत त्यांना यापुढे अनुदान भेटणार नाही
Nuksan Bharpai GR 2025 Maharashtra
केंद्र शासनाची अॅग्रिस्टेंक ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले आहे.
दि.१५ जुलै २०२५ पासून मदत व पुनर्वसन विभागातर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत्तीपिक/शेतजमीनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या अॅग्रिस्टॅक योजने ( Agristack scheme ) अंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र (Farmer unique id – farmer id) बंधनकारक करण्यात येत आहे.
शेतीपिक नुकसान मदतीसाठी प्रचलित पध्दतीने पंचनामे करतांना त्यामध्ये एक रकाना (field) Farmer Unique ID (Agristack Farmer id ) साठी ठेवण्यात यावा.
शेतीपिक नुकसान मदत वाटपाच्या डिबीटी प्रणालीमध्येही एक रकाना (field) शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) क्रमांक साठी तयार करुन त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) भरण्यात यावा.
29 April 2025 GR PDF Link
Click Here 👇