शंखी गोगलगाईच्या प्रादुर्भाव मुळे बाधित झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ₹१३,८०० ( Nuksan bharpai 2022) मदत वितरीत, GR आला.

Snail Nuksan bharpai 2022 GR
राज्यात शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपीकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान ( nuksan bharpai 2022) दिले जाते.
हे निविष्ठा अनुदान एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहीत दराने मदत म्हणून देण्यात येते.
तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबी करिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.
राज्यात जुलै 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत तसेच इतर नुकसानेकरिता मदत देण्याबाबत दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे.
ज्यामध्ये जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी रु6800/ प्रति हेक्टर 2 हेक्टरांच्या मर्यादित दिल्या जाणाऱ्या मदती ऐवजी रु13600 प्रति हेक्टर 3 हेक्टर यांच्या मर्यादित मदत दिली जाणार आहे.
तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी ₹13,500/-प्रती हेक्टर 2 हेक्टर मर्यादित रुपये प्रति हेक्टर ऐवजी २७,००० रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादित दिली जाणार आहे.
याचप्रमाणे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी दिली जाणारी ₹१८,००० प्रति हेक्टर दोन हेक्टर च्या मर्यादित असलेली मदत आता ₹३६,००० प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादित दिली जाणार आहे.
तसेच इतर नुकसानी करिता ही मदत जाहीर करण्यात आली आहे मात्र याचबरोबर चालू हंगामामध्ये लातूर उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शंकी गोगलगायी मुळे पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल राज्य शासनास प्राप्त झाला होता.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये या नैसर्गिक आपत्तीचा समावेश आहे यामुळे राज्यमंत्रिमंडळाच्या दिनांक 16- 8- 2022 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार चालू हंगामातील शंखी गोगलगायीमुळे झालेल्या शेतीकांच्या नुकसानीचे पंचनामे करून विहित नमुन्यात निधी मागण्याची प्रस्तावना प्रस्ताव शासनाकडे अशा स्वरूपाच्या सूचना दिनांक 25- 8- 2022 च्या पत्रान्वये सर्व विभागीय आयुक्त यांना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडून गोगल गाई मुळे शेती पिकांच्या झालेले नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचा प्रस्ताव ०६ सप्टेंबर २०२२ रोजी शासनास पाठवला होता.
आणि याच प्रस्तावानुसार बाधित शेतकऱ्यांना शेतपिकांचे नुकसान करिता मदतीचे ( nuksan bharpai 2022 ) वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, यासाठी दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करून ही मदत जाहीर करण्यात आली आहे.
शासन निर्णय PDF खालील लिंक वर क्लिक करा
चालु हंगामामध्ये शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत..
चालू हंगामातील लातूर उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंकी गोगलगायीमुळे झालेले नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 9858.80 लक्ष इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्याना वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे.

पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. या शासन निर्णयानव्ये संपूर्ण रक्कम भीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत असली तरी, लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करून त्यानंतरच रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरित करण्याबाबत दक्षता द्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सदर निधी अनावश्यकरीत्या कोषागार आतून आहरीत करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यात यावा.
याचबरोबर लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या सर्व सूचनाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा अधिकारी यांची राहील अशे निर्देश देखील देण्यात आले आहेत.