ड्रायव्हिंग लायसन्स, PAN Card सह DIGI LOCKER आता तुमच्या व्हॉट्सॲप वर

Citizens can now access Digilocker services on the MyGov Helpdesk on WhatsApp

MyGov Helpdesk on WhatsApp

आता व्हॉट्सॲप वर पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र यासारखी अन्य डिजी-लॉकर ( Digi Locker ) कागदपत्र नागरिकांना डाउनलोड करता येणार आहेत.

व्हॉटस अ‍ॅपवरील MYGOV helpdesk वर नागरिकांना डिजी-लॉकर ( Digi Locker ) सुविधा उपलब्ध होणार

पॅन कार्ड ( pan card) , वाहन चालक परवाना ( Driving licence), वाहन नोंदणी प्रमाणपत्र ( RC book) यासारखी अन्य डिजी-लॉकर कागदपत्र नागरिकांना डाउनलोड करता येणार

सरकारी सेवा सहज उपलब्ध, सर्वसमावेशक, पारदर्शक आणि सुलभ  राखण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाउल म्हणून नागरिकांना व्हॉटस अ‍ॅपवरील माय जीओव्ही हेल्प डेस्कच्या ( mygov helpdesk ) माध्यमातून डिजी-लॉकर ( MyGov Helpdesk on WhatsApp ) सुविधा उपलब्ध करणार  असल्याचे माय जीओव्ही मंचाने आज घोषित केले.

या सुविधेअंतर्गत डिजी-लॉकर खात्याचे प्रमाणीकरण, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि अन्य डिजी-लॉकर कागदपत्र डाउनलोड करणे यासारख्या सेवा नागरिकांना व्हॉटस अ‍ॅप वर उपलब्ध होतील.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार डिजिटल भारत योजनेच्या ( digital India) माध्यमातून नागरिकांचे “जीवन सुकर” करण्यासाठी काम करत आहे. या संदर्भात व्हॉटस अ‍ॅपवरील वरील माय जीओव्ही हेल्प डेस्क हे प्रशासन आणि सरकारी सेवा नागरिकांच्या हाताच्या बोटावर आणण्याच्या दिशेने महत्वाचे पाउल आहे.

व्हॉट्सॲप वरील mygov helpdesk वर मिळणाऱ्या सुविधा

  • पॅन कार्ड ( Pan card)
  • वाहन चालक परवाना ( Driving licence)
  • सीबीएसई इयत्ता X वी उत्तीर्णता प्रमाणपत्र
  • वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC Book )
  • जीवन विमा- दुचाकी  ( life insurance)
  • इयत्ता X वी गुण पत्रिका ( 10th Mark list)
  • इयत्ता XII वी गुण पत्रिका ( 12 th Mark list)
  • विमा कागदपत्र (जीवन विमा अथवा या व्यतिरिक्त विमा विषयक कागदपत्रे डीजी लॉकरवर उपलब्ध)

या सुविधेचा लाभ देशभरातील व्हॉटसअ‍ॅप ( WhatsApp user) वापरकर्ते चॅट बॉट वर  ‘नमस्ते अथवा हाय किंवा  डीजी लॉकर’ असा संदेश +91 9013151515 या व्हॉटस अ‍ॅप क्रमांकावर पाठवून या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

संपूर्ण देशात मार्च 2020 पासून MYGov WhatsApp helpdesk सुरू करण्यात आला आहे. उद्घाटन झाल्यापासून व्हॉटस अ‍ॅप वरील माय जीओव्ही हेल्प डेस्कने  (mygov helpdesk) ( यापूर्वीचे माय जीओव्ही कोरोना हेल्प डेस्क mygov corona helpdesk ) नागरिकांना कोविड बाबतची विश्वासार्ह माहिती, लसीकरण नोंदणी आणि लसीकरण प्रमाणपत्र  डाउनलोड करणे यासह अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

डीजी लॉकर वर आतापर्यंत 100 दशलक्षांहून अधिक नागरिकांनी नोंदणी ( registration) केली असून 5 अब्जाहून अधिक कागदपत्रे वितरीत करण्यात आली आहेत.

व्हॉटस अ‍ॅपवरील ही सेवा विश्वासार्ह माहिती, व्हॉटस अ‍ॅप वरील कागदपत्रे मोबाईल फोनच्या माध्यमातून उपलब्ध करून नागरिकांना ‘डिजिटल सक्षम’ बनवत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: