वृक्ष, फळ फुल लागवड अनुदान योजना, लाभ घेण्याचे विभागाचे आवाहन | MGNREGA SCHEME 2024

MGNREGA scheme 2024 अंतर्गत अमृत महोत्सवी फळझाड, वृक्षलागवड, फुलपिक लागवड योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना प्रशासनाचे आवाहन

MGNREGA SCHEME 2024

MGNREGA SCHEME 2024

ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम देणे आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्याच्या दुहेरी  उद्देशाने राज्यात ‘महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना’ राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून गावा गावातील सार्वजनिक विकासाची विविध कामे हाती घेतली जातात. तसेच शेतकऱ्यांना लाभ होणाऱ्या अनेक योजना या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट होत असल्याचे चित्र दिसते आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये 19 लाख 50 हजार कुटुंबातील 32 लाख 50 हजार  मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच योजनेंतर्गत 700 लाख मनुष्यदिवसांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये महिलांचा 44 टक्के इतका वाटा आहे. आतापर्यंत 2 हजार 963 कोटी इतका खर्च या योजनेत झाला असून त्यापैकी 1 हजार 850 कोटी इतका खर्च अकुशल मजुरीवर झाला आहे.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमीनीवर अमृत महोत्सवी फळझाड लागवड, फुलपीक लागवड कार्यक्रम राबवण्यात येतो. या कार्यक्रमात अल्प भूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात पूर्वी समाविष्ट असलेल्या आंबा,  काजू, नारळ, पेरू, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, सिताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, फणस, कोकम,  अंजिर, चिकू या फळझाडांसोबतच केळी, ड्रॅगनफ्रुट, ॲव्हाकॅडो, द्राक्ष या फळझाडांचा आणि सोनचाफा फुलझाडे तसेच लवंग, दालचिनी, मिरी आणि जायफळ या मसाला पिकांचाही समावेश करण्यात आला आहे.

फळबाग लागवडीचा कार्यक्रम राबवण्यात येत असलेल्या अडचणींचा विचार करून क्षेत्रीय स्तरावर योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लाभार्थ्यांना ऑनलाईन मागणी करण्याची सुविधा दिल्यामुळे योजना पारदर्शकपणे राबवण्यात येत आहे.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना सिंचन विहरींचा लाभ देण्यात येतो. सिंचन विहीरीच्या खर्चाची मर्यादा 4 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच किमान 150 मीटरची अट रद्द केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. नागपूर विभागातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सिंचन विहीरींचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.  तसेच मनरेगा अंतर्गत आता कांदा चाळ निर्मितीसही मान्यता देण्यात आली आहे.

शाळांच्या सुरक्षेचा विचार करता शाळांना संरक्षण भिंत असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शाळांना सुरक्षा भिंत बांधण्याचे काम मनरेगा अंतर्गत घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राज्यात मिशन बांबू लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये राज्यात 10 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे उद्दीष्ट ठरवण्यात आले आहे. तसेच यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 7 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येते. पर्यावरण संरक्षणासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुरधारण्यात या मिशन बांबूमुळे हातभार लागणार आहे.

मनरेगा अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमध्ये प्रती किलोमीटर लांबीचा रस्ता मातीकामासह खडीकरणासाठी 15 लाख रुपयांचा निधी तसेच फक्त डांबरीकरणासाठी 13 लाख रुपयांचा निधी दिला जातो. या कामांसाठी अकुशल मजुरीवरील खर्च किमान 3 लाख रुपये व कुशल म्हणजेच साहित्यावरील 2 लाख रुपये असा एकूण 5 लाख रुपये खर्च मनरेगा अंतर्गत करणे बंधनकारक आहे. राज्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत 50 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात येत आहेत.

भूमिगत पाण्याची पातळी उंचावण्याची गरज लक्षात घेऊन केंद्र शासन पुरस्कृत जनशक्ती अभियान कार्यक्रमांतर्गत ‘कॅच द रेन’ मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी लागणारे शोष खड्डे निर्मितीसह इतर जलसंधारणाची कामे मनरेगा अंतर्गत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाईवर उपाययोजना म्हणून गायरान, वैयक्तिक जमिनीवर मनरेगा अंतर्गत चारा पिकांची लागवड करण्यात येते.

एकूणच राज्याच्या ग्रामीण भागाचा विकास करणे आणि शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक स्त्रोत निर्माण करून देण्याऱ्या विविध योजना मनरेगा अंतर्गत राबवण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट होत आहे. गेल्या दोन वर्षात मनरेगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ग्रामीण, शेत, पाणंद रस्त्यांची निर्मिती झाली आहे. त्याशिवाय सिंचन विहीरी, फळबाग लावगड या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळवून देण्यात आली आहे. मिशन बांबू लागवडीच्या माध्यमातून शेती क्षेत्रात क्रांती होणार आहे. शेतीची कामे नसणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या हाताला काम देऊन त्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करण्याचे काम महात्मा गांधी रोजगार हमी योजना ग्रामीणच्या माध्यमातून होत आहे.

राज्यातील एकुण 85% जमीन ही लागवडीसाठी योग्य असून येथील माती सुपिक व मुबलक पाणी उपलब्ध असल्याने 60% शेतकरी हे पारंपारिक पध्दतीने शेती करतात. त्यामुळे शेतक-यांचे सरासरी उत्पन्न हे एक लाख पेक्षा कमी असल्याचे दिसुन येते.

आजादी का अमृत महोत्सव व सेवा पंधरवड्यानिमित वृक्षारोपण मोहिम राबविल्यास, समृध्द गावाची संकल्पना प्रत्यक्षात येऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना तर्गत ( MGNREGA SCHEME 2024 ) वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड,वृक्षलागवड फुलपिक लागवड कार्यक्रम राबविणे शक्य आहे.

फळपिक लागवड, वृक्ष लागवड ही हमखास शेतक-यांना उत्पन्न देणारी पिके आहेत. त्यामुळे शेतक-यांना शाश्वत उत्पन्नाची हमी मिळणे तसेच शेतकरी स्वतः जॉबकार्ड धारक असल्यामुळे किमान 100 दिवसांचा रोजगार स्वतःच्याच शेतावर काम करून मिळवू शकतो.

तसेच स्वतःच मग्रारोहयो अंतर्गत स्वतःच्या फळपिकांसाठी काम करत असल्यामुळे फळ, वृक्ष पिकांची काळजी चांगल्या प्रकारे घेतली जाऊ शकते. त्याचबरोबर त्याचा बेरोजगारीचा प्रश्न सुटून फळ, वृक्ष पिकाच्या लागवडीने शाश्वत उत्पन्न वाढ होऊन शेतकरी हा लखपती होऊन समृध्दी बजेटची संकल्पना पुर्णत्वाकडे नेण्यास मदत होणार आहे.

या योजनेत जवळपास 59 प्रकारची फळ, वृक्ष पीके, 16 प्रकारची औषधी वनस्पती लावगड, 4 प्रकारची फुलझाडे आणि 4 प्रकारची मसाला पदार्थाची उत्पन्न शेतकरी घेऊ शकतो. ज्यामुळे बाजारभिमुख शेती (Market Oriented Agriculture) करुन ज्या मालाला बाजारपेठेत चांगला व शाश्वत असा भाव आहे अशी शेती केली जाऊ शकते.

https://www.prabhudevalg.com/2022/08/falbag-lagvad-yojana-manrega.htmlhttps://www.prabhudevalg.com/2022/08/falbag-lagvad-yojana-manrega.html

त्यामुळे उत्पन्न निश्चिती होऊन शेतक-यांचा एकंदर आर्थिक विकास होऊन आर्थिक सुबत्ता येण्यास निश्चितपणे मदत होऊ शकते. यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत दि. 13 एप्रिल, 2022 रोजी वृक्ष, फळबाग लागवड ( MGNREGA SCHEME 2022 ) संदर्भात या कार्यालयाने एक परिपत्रक देखील निर्गमित केलेले आहे. त्यानुसार या योजनेचे संनियंत्रने व अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी प्रत्येक गावासाठी एक ग्रामस्तरीय पालक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे.

त्यामध्ये ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. फळ, वृक्ष, फुलपिके, मसालापीके लागवड करण्याचे उद्दीष्ट प्रत्येक ग्रामस्तरीय पालक अधिकारी यांना देण्यात आलेले होते.

त्यानुसार संपूर्ण राज्यामध्ये वृक्ष, फळ, फुल, मसाला पीके लागवडीची ( MGNREGA SCHEME 2023 ) मोहिम सुरु करण्यात आलेली आहे. या मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी या कालावधीमध्ये फळबाग, वृक्ष लागवडीचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी संबंधीत तालुक्याच्या पंचायत समिती, तालुका कृषि अधिकारी कार्यालय व वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय (सामाजिक वनीकरण) स्तरावर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.

ज्या शेतक-यांनी ग्रामपालक अधिकारी यांचेकडे फळ, वृक्ष लागवडसाठी अर्ज दिलेला असेल व अद्यापपर्यंत फळ, वृक्ष लागवड vruksh lagvad anudan yojana कामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाले नसल्यास संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय, तालुका कृषि अधिकारी कार्यालय अथवा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय स्तरावर उपरोक्त दिनांक दरम्यान संपर्क साधावा व कार्यारंभ आदेश प्राप्त करुन घेण्याचे सर्व संबंधीत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

तसेच अद्यापपर्यंत ज्या शेतक-यांनी फळबाग, वृक्ष लागवड करण्यासाठी अर्ज केलेला नसेल अशा शेतक-यांनी संबंधीत ग्राम पालक अधिकारी यांचेकडे फळ, वृक्षलागवड मोहिमेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज (अर्ज प्रपत्र अ, ब मध्ये) सादर करावा. त्यासाठी केवळ संबंधित जमीनीचा 7/12 व जॉब कार्ड या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

जिल्ह्यातील सर्व शेतकरी, शेतक-यांसाठी काम करणा-या सर्व समाजसेवी संघटना यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

https://nrega.nic.in/Nregahome/MGNREGA_new/Nrega_home.aspx

https://youtu.be/HNOqR7kKCOo

https://www.prabhudevalg.com/2022/08/falbag-lagvad-yojana-manrega.html

https://www.prabhudevalg.com/2022/08/chandan-lagvad-anudan-mregs-schemes.html

Falbag lagvad yojana

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: