शेतीच्या रस्त्यासाठी मिळणार या योजनेतून अनुदान | Matoshri gram samruddhi shet raste yojana

शेतीच्या रस्त्यासाठी मिळणार matoshri gram samruddhi shet raste yojana तून अनुदान.

Matoshri gram samruddhi shet raste yojana पार्श्वभूमी

राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

Matoshri gram samruddhi shet raste yojana

राज्यात शेत-पाणंद रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना तयार पीक बाहेर काढून साठवणे व बाजारात विकणे अवघड जाते. 

पावसाळ्यातील पीके आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली तरी रस्त्याअभावी ती पिकविण्याचा विचार करता येत नाही. पाणंद रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पीक घेण्यात मोठा अडसर होतो.

शेतामधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे तसेच यांत्रिकीकरणामुळे शेती मध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येत असल्यामुळे तसेच शेतमाल बाजारात पोहोवण्याकरिता व यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठीही शेतीला बारमाही शेत रस्त्याची आवश्यकता असते,

मातोश्री ग्राम समृध्दी शेत शिवार पाणंद रस्ते योजना शासन निर्णय Matoshri gram samruddhi shet raste yojana govt gr

विविध योजनांच्या अभिसरणामधून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजना राबविणेबाबत .

तसेच शेत रस्ते हे इतर योजनांमध्ये येत नसल्यामुळे शासनाने या शेत रस्त्यांना अनुदान देण्यासाठी सन 2018 मध्ये पालकमंत्री पांदन रस्ते योजना राबविण्याकरिता मंजुरी दिलेली होती मात्र आपण जर पाहिलं तर प्रत्यक्ष योजनेची अंमलबजावणी करत असताना विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणी येत होत्या.

याच प्रमाणे सदर योजनेमध्ये तयार होणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता ही परिभाषित केलेली नसल्यामुळे बर्‍याच ठिकाणी शेत रस्त्याचे काम होऊन सुद्धा रस्त्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटलेला नाही.

याच प्रमाणे आपण जर पाहिलं तर पालकमंत्री पांदन रस्ते योजनेच्या अंतर्गत रस्त्यांची गुणवत्ता परिभाषित केले नसल्यामुळे काही ठिकाणी अतिक्रमण काढून रस्त्यावर फक्त माती टाकली जाते यांनी रस्ता रुंद झालेला दिसून येतो परंतु पावसाळा या सारख्या ऋतूमध्ये शेतकऱ्यांना हा रस्ता वापरता येत नाही पाऊस पडल्यावर तेथे चिखल होतो तसेच अधिक पाऊस झाल्यास ही माती वाहून जाते आणि हा रस्ता पूर्णपणे या ठिकाणी खराब होऊन जातो.

Watch about Matoshri shet shivar raste yojana

महाराष्ट्र मधील प्रत्येक शेतकरी आणि गावकरी समृद्ध होतील यासाठी आपण जर पाहिले तर महाराष्ट्रामध्ये मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना या ठिकाणी राबवली जात आहे आणि या संकल्पनेचा अंतर्गत पालकमंत्री पाणंद रस्ता, मनरेगा, रोहयो इत्यादी योजनेचा अभिसरण करून मातोश्री ग्राम समृध्दी शेत शिवार पाणंद रस्ते योजना (Matoshri gram samruddhi shet raste yojana ) राबविली जात आहे

या योजनेच्या अंतर्गत विविध प्रकारचे रस्ते बनविण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे

याच्यामधील पहिला प्रकार आहे एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे रस्ते ज्याच्या अंतर्गत ग्रामीण रस्ते व हद्दीचे ग्रामीण रस्ते ज्यांना गाव नकाशा मध्ये दोन भरीव रेषांना दाखवले असून त्या रस्त्याची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांक मध्ये समाविष्ट केलेली नाही.

ग्रामीण गाडीमार्ग हे गाव नकाशा मध्ये तुटक दुबार रेषेने दाखवले असून ज्या भूमापन क्षेत्रांमधून जाते त्यामध्ये पोट खराब म्हणून दर्शवलेले आहे ज्या रस्त्यांची नोंदणी १६.५ ते २१ फूट आहे असे रस्ते या योजनेअंतर्गत बनवले जाणार आहेत.

याच प्रमाणे पाय मार्ग जे गाव नकाशा मध्ये तुटक रेषेने दर्शवलेल्या असून ज्या भूमापन क्षेत्रामधून जातो त्यामध्ये पोट खराब म्हणून दर्शवलेले आहे या रस्त्याची रुंदी आठ फूट आहे अशा प्रकारचे रस्ते या योजनेच्या अंतर्गत बनवण्याकरता मंजुरी देण्यात आली आहे.

Matoshri gram samruddhi shet raste yojana योजनेअंतर्गत बनवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेला रस्त्याच्या दुसऱ्या प्रकारामध्ये पायी मार्ग, गाडीमार्ग हे रस्ते जे नकाशा वरती दर्शवलेले नाहीत परंतु वाद निर्माण झाल्यास अशा रस्त्याबाबत निर्णय देण्याचा अधिकार हे कलम 143 नुसार तहसीलदारांना देण्यासाठी आलेले आहेत.

त्याचप्रमाणे इतर ग्रामीण रस्त्याना सुद्धा याच्या अंतर्गत मंजुरी देण्यात आलेले आहे, याचप्रमाणे या योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे शेत पाणंद रस्त्याचे काम हाती घेता येतील.

  • अस्तित्वा मधील शेत पाणंद रस्त्याचे मजबुतीकरण करणे
  • शेत पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा पक्का रस्ता एकत्रितपणे करणे

Matoshri gram samruddhi shet raste yojana अंदाजपत्रक

या योजनेच्या अंतर्गत रस्ते बनविण्याकरिता काही नमुना अंदाजपत्रक देखील निश्चित करण्यात आलेली आहेत, त्याच्यामध्ये एक किलोमीटर खडीकरण रस्त्याचे अंदाजीकरण यामध्ये मनरेगाच्या अकुशल अंतर्गत ९ लाखा 2हजार 879 रुपये तर मनरेगाच्या कुशल रोजगार अंतर्गत ६ लाख १ हजार 919 रुपये व राज्य रोजगार हमी योजनेच्या कुशल रोजगार योजनेअंतर्गत ८ लाख ८० हजार ५८ रुपये असे एकूण एक किलोमीटर खडीकरनासह रस्त्यासाठी २३ लाख ८४ हजार ८५६ रुपये एवढा खर्च अंदाजपत्रक नुसार अपेक्षित आहे.

याचप्रमाणे काही साधे रस्ते असेल त्याच्या मध्ये एक किलोमीटर मुरमाच्या पक्के रस्त्याचा अंदाजपत्रकामध्ये आपण जर पाहिलं तर मनरेगा अंतर्गत अकुशल चे ७ लाख 58 हजार 683 रुपये तर मनरेगा च्या अंतर्गत २लाख रुपये असे एक किलोमीटर मुरमाच्या पक्के रस्त्याच्या अंदाजपत्रकामध्ये ९ लाख 76 हजार ४२० रुपये एवढा खर्च अंदाजीत निश्चित करण्यात आलेला आहे.

Labharthi yadi

याचप्रमाणे Matoshri gram samruddhi shet raste yojana या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता कार्यान्वयीन यंत्रणा देखील निश्चित करण्यात आलेले आहे. ज्याच्या मध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, उपविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभाग आणि वनविभाग जीथे वन विभागाची जमीन असेल अशा ठिकाणी या यंत्रांच्या मार्फत रस्त्याचे काम घेतली जातील केली जातील.

याच प्रमाणे आपण आराखडा मंजुरीच्या जर पाहिलं तर ग्रामपंचायत अंतर्गत सर्व गावांमध्ये आवश्यक असलेल्या शेत पाणंद रस्त्यांच्या आराखडा ग्रामसभेच्या मंजुरी ने ग्रामपंचायत तयार करेल.

वरील प्रमाणे तयार करण्यात आलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीची शेत पाणंद रस्त्याची यादी गट विकास अधिकारी एकत्रित करतील आणि ही यादी जून पर्यंत ते पुढे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करतील याच्यानंतर साधारणपणे 30 जून पर्यंत या रस्त्याच्या कामाला मंजुरी रस्ते काम करून घेणे अशा प्रकारचे सर्व कामे पार पाडली जावीत अशा प्रकारचे निर्देश सुद्धा राज्याचे रोजगार हमी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.

Matoshri gram samruddhi shet raste yojana योजनेच्या कामाचे अंतर्गत जी काही कामे घेतली जाते याला तांत्रिक मान्यता देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्यामार्फत तहसील, गटविकास अधिकारी यांच्याकडे कामाच्या आराखडे आहेत ते आराखडे तांत्रिक रोहयो मंत्री महोदयां मार्फत निश्चित केले जातील आणि पुढे या कामांना तहसीलदार, गट विकास अधिकारी प्रशासकीय मान्यता देतील.

2 thoughts on “शेतीच्या रस्त्यासाठी मिळणार या योजनेतून अनुदान | Matoshri gram samruddhi shet raste yojana”

  1. मारोती भिमराव रक्ताटे

    नमस्कार साहेब, वैयक्तिक माझ्या शेतात जाण्यासाठी मजबुतीकरण झालेल्या रोड पासून 600 मीटर अंतर आहे,मी या मातोश्री पांदण रस्ता करण्यासाठी, मी स्वतः अर्ज करुन पांदण रस्ता करु शकतो का, आणि याचा अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे. कृपया आपले मार्गदर्शन हवे आहे साहेब.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: