ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोडखबर ! आता घरबसल्या कुठल्याही कारखान्याला करा ऊसाची नोंदणी, साखर आयुक्तालयाकडून Maha-US Nondani ॲपची निर्मिती.

Maha-US Nondani Application 2022
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या शेतातील ऊसाची नोंदणी साखर कारखान्यांकडे करताना अनेक अडचणी येतात, बर्याच वेळा यात काही गैरप्रकार हि घडतात मात्र, आता या अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्ताच्या निर्देशानुसार साखर आयुक्तालयाकडून ‘महा-ऊस नोंदणी’ ( Mahaus Nondani application ) या ॲपची निर्मिती केली आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता सहज घरबसल्या आपल्या शेतातील उसाची साखर कारखान्याला नोंदणी करता येणार आहे.
यासाठी सर्वप्रथम आपल्याला गूगल प्ले स्टोर मधून ‘महा-ऊस नोंदणी’ (Maha-US Nondani) हे ॲप डाउनलोड करुन घ्यावे लागणार आहे.
Application Link Click Here
महाऊस नोंदणी ( Mahaus Nondani Application ) या ॲपमध्ये शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल नंबर द्वारे आपली नोंदणी करून ऊस लागवडीची जिल्हा, तालुका, गाव तसेच गट नंबरनिहाय माहिती भरावी लागणार आहे.
याचबरोबर शेतकऱ्यांना आपल्या उसाचा लागवड हंगाम, उसाची जात, लागवडीची तारीख आणि लागवडीचे क्षेत्र याची माहिती हि या महाऊस नोंदणी अँप्लिकेशन द्यावी लागेल.
हि सर्व माहितीभरल्या नंतर आपला ऊस कोणत्या कारखान्याला पाठवायचा आहे ते निवडावे लागेल. या नोंदणी साठी शेतकरी तीन साखर कारखान्यांचे पर्याय भरू शकतील. या साठी शेतकऱ्यांना राज्यातील सहकारी आणि खासगी अशी एकूण 200 साखर कारखान्यांचा पर्याय उपलब्ध असणार आहेत.