मतदान कार्डला होणार आधार लिंक | Link Aadhar to voter ID 2022

मतदार कार्डसोबत आधार जोडणीसाठी ( Link Aadhar to voter ID 2022 ) नागरिकांनी पुढाकार घेण्याचे शासनाचे आवाहन.

Link Aadhar to voter ID

नागरिकांचे नाव कोणत्याही एकाच मतदार संघातील मतदार यादीत कायम ठेवता यावे या उद्देशाने मतदार कार्ड सोबत आता आधार क्रमांक लिंक (Linking Aadhar to voter ID 2022) केला जाणार आहे. 

मतदार यादीतील ( Voter list ) नावाशी आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्यासाठी 1 ऑगस्ट 2022 पासून मोठया संख्येने पुढाकार घ्यावा, असे आवाहन शासनाच्या वतीने केले आहे.

मतदार नमुना फॉर्म क्र. 6 ब ( form 6B ) व्दारे नागरिक आपला आधार क्रमांक ( Aadhar Number ) सादर करू शकतात. आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्यावतीने ऐच्छिक आहे. 

याचबरोबर नमुना फॉर्म क्र. 6 ब BLO यांच्या मार्फतही घरोघरी भेटी देवून ही शासनामार्फत गोळा करण्यात येईल.

विशेष शिबिराच्या ( special camp for linking aadhar to voter id ) आयोजनामधूनही नमुना फॉर्म क्र. 6 ब गोळा करण्यात येईल. 

मतदार कार्डसोबत आधार जोडणीसाठी पॅनकार्ड, फोटोसहीत किसान पासबुक, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटोसहीत पेन्शन कागदपत्रे, केंद्र व राज्य शासन कर्मचा-यांचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागातील ओळखपत्र यापैकी एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. 

मतदार यादीशी आधार क्रमांकाची जोडणी करणे ऐच्छिक आहे.

आधार नोंदणी प्रक्रिया Link Aadhar to voter ID procedure 

प्रत्येक मतदाराकडून आधार क्रमांक विहीत स्वरूपात व विहीत रितीने मिळविण्यासाठी वैधानिकरित्या मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. 

17 जून 2022 च्या अधिसूचनेनुसार 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक व्यक्ती त्याचा आधार क्रमांक नमुना फॉर्म क्र. 6 ब मध्ये भरून देवू शकतो. 

आवश्यक नमुना फॉर्म क्र.6 ब च्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध करून देण्यात येईल.

नमुना फॉर्म क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या eci.gov.in व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ococlection.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. 

मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना फॉर्म क्र.6 ब ERO NET GARUDA NVSP, VHP या माध्यमांवर देखील उपलब्ध करून देण्यात येईल, 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: