संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या अनुदान व कर्ज योजना | LIDCOM schemes 2023

LIDCOM Scheme चर्मकार समाजाच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन.

LIDCOM schemes

LIDCOM schemesSant Rohidas Charmodyog
& Charmakar Vikas Mahamandal

राज्यात चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासाठी  1 मे 1974 रोजी कंपनी कायद्या अंतर्गत एका महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाचे दि. 2.1.2003 च्या शासन निर्णयानुसार संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मर्यादित’ असे नामकरण करण्यात आले.

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ या महामंडळाच्या अंतर्गत अनुसूचित जातीतील चर्मकार समाज व त्यांच्या पोटजाती उदा. चांभार, ढोर, होलार, मोची इत्यादी यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास करुन त्यांना दारिद्र्य रेषेच्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.

चर्मकार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी अर्ज करण्याचे तसेच, केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभासाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात कागदपत्रे सादर करावीत

अनुदान योजना व बीजभांडवल योजनेअंतर्गत परिपूर्ण कागदपत्र असलेले कर्ज प्रस्ताव स्वीकारले जातील. तसेच एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केलेले असून ज्याची लाभार्थी निवड समितीमार्फत निवड झाली आहे, अशा लाभार्थ्यांची यादी महामंडळाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. संबंधित पात्र अर्जदारांनी परिपूर्ण कागदपत्रांसह महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांनी केले आहे.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ ( Sant Rohidas Charmodyog
& Charmakar Vikas Mahamandal
) मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना 

50 टक्के अनुदान योजना

या योजनेमध्ये राष्ट्रीयकृत बँकेमार्फत रु. 50,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या व्यवसायासाठी सवलतीच्या दराने अर्थसहाय्य दिले जाते. 

या अर्थ सहाय्यापैकी रु. ५०,000/- ते ५,००,००० कमाल मर्यादेपर्यंत 50 टक्के कर्जाची रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते. उर्वरित 50 टक्के कर्जाची परतफेड ४८ समान मासिक हप्त्यांत अथवा बँकेने ठरवून दिलेल्या हप्त्यांत बँकेकडे करावी लागते. 

बँकेकडून या योजनेखाली मिळणाऱ्या कर्जावर द. सा. द.शे. ४%  दराने व्याज आकारले जाते.

कमाल अनुदान मर्यादा रु १०,००० दिली जाते.

बीज भांडवल योजना

या योजनेमध्ये ५०,००० रुपये ते ५ लाख  रुपये पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही योजनेसाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो. बँकेमाफत हा कर्जपुरवठा द. सा. द. शे. 9.5 ते 12.5 टक्के व्याज दराने करण्यात येतो. बँकेने मंजूर केलेल्या कर्ज रकमापैकी 75 % कर्ज रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येते.

या योजनेअंतर्गत 5 %  रक्कम ही लाभार्थ्यांने स्वहिस्सा म्हणून बँकेकडे जमा करावयाची असते. उर्वरित 20 % रक्कम ही संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ बीज कर्ज उपलब्ध करून देते. या कर्ज रक्कमेपैकी रु. १० हजार  अनुदान म्हणून देण्यात येते तर उर्वरित रक्कम ही 4 % व्याजदराने बीज कर्ज म्हणून देण्यात येते.

सर्वसाधारण अटी व नियम

  • लाभासाठी अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय १८ ते ६० असावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी – रु.39,308 /- आणि शहरी भागासाठी – रु.54,496/- 
  • अर्जदारास तो करु इच्छिणाऱ्या व्यवसायाचे ज्ञान असावयास हवे यासाठी प्रशिक्षण घेतलेले असावे.  
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा व कायम रहिवासी असावा. 
  • अर्जदाराने अन्य शासकीय संस्थांकडून अनुदान घेतलेले नसावे व तो कोणत्याही संस्थेचा थकबाकीदार नसावा. 
  • अर्जदाराने सादर केलेला जातीचा व उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकाऱ्याने दिलेला असावा.
  • अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :
  • अर्जदाराचा शैक्षणिक प्रमाणपत्र, 
  • उत्पन्नाचा दाखल, 
  • अर्जदाराचा जातीचा दाखला, 
  • अर्जदाराचे नुकताच काढलेला पासपोर्ट साईजचा फोटो.
  • रेशनकार्डची झेरॉक्स प्रत,
  • व्यवसायासाठी लागणाऱ्या स्थावर मालमत्तेच्या किंमतीचे दरपत्रक,
  • अर्जदारास ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेच्या उपलब्धतेचा पुरावा किंवा भाड्याचे करारपत्र.
  • अर्जदारास व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका अथवा महानगरपालिकेचा ‘ना हरकत” परवाना अथवा दुकाने अधिनियमाखालील परवाना (बीज भांडवल कर्ज मागणीसाठी).
  • प्रकल्प अहवाल (बीज भांडवल कर्ज मागणीसाठी), दोन सक्षम जामिनदार, एक नोकरदार व एक शेतकरी असावा, तसेच जामिनदारांचे प्रतिज्ञापत्र व पगारपत्रक (बीज भांडवल कर्ज मागणीसाठी)

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ अनुदान, बिजभांडवल योजनेसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

या दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. चर्मकार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपसिथत राहून दाखल करावीत.

त्रयस्थ / मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत.

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतील.

Sant Rohidas Charmodyog
& Charmakar Vikas Mahamandal
loanscheme Documents

सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसीलदार यांच्याकडून घेतलेला अर्जदाराच्या कुटूंबाचा उत्पन्नाचा दाखला. नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तीन प्रतीत जोडावे. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला. राशन कार्ड झेरॉक्स प्रती, आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, व्यवसायाचे दरपत्रक,

व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नंबर आठ), लाईट बील, टॅक्स पावती, बिजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन्स परवाना बॅच, व्यवसायाचे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र याप्रमाणे कागदपत्रे स्वयंसांक्षाकित करुन घोषणापत्र देण्यात यावे.

प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार, समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ यांनी केले आहे.

2 thoughts on “संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या अनुदान व कर्ज योजना | LIDCOM schemes 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: