कुक्कुटपालन अनुदानात वाढ, GR निर्गमित | Kukut Palan Yojana

Kukut Palan Yojana – राज्य शासनाच्या जिल्हा वार्षिक सर्वसाधारण एकात्मिक कुक्कुट विकास योजनेतील ५०% अनुदानावर दिल्या जाणाऱ्या तलंगा, नर कोंबडे व कुक्कुट पक्षी गटाच्या अनुदानात वाढ, Backyard poultry GR निर्गमित

Kukut Palan Yojana

Kukut Palan Yojana – Navinypurna yojana 2023

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास ही योजना राज्यात सन २०१० पासुन राज्यात कार्यान्वित आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी तलंगा गट (२५ तलंगा + ३ नर कोंबडे) वाटप व १०० एक दिवशीय सुधारित कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप केले जाते.

सद्यस्थितीत उबवणीची अंडी, तलंगा, नर कोंबडे व एकदिवसीय कुक्कुट पिल्ले या सर्वांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे.

तसेच कुक्कुट खाद्यासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किंमती, औषधी व इंधनामध्ये देखील दर वाढ झालेली असल्याने कुक्कुट खाद्य, कुक्कुट पक्षांना लागणारी औषधी व वाहतुक खर्चात देखील वाढ झालेली आहे.

आणि याच अनुषंगाने या योजनेंतर्गत वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किंमती निश्चित करुन या बाबी साठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Backyard poultry gr pdf link

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण एकात्मिक कुक्कुट विकास या योजनेंतर्गत 50 टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्यागटाच्या आधारभूत किंमतीत सुधारणा

या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किंमतीत सुधारणा करण्यात आली आहे.

नवीन अनुदान खालील प्रमाणे असेल.

Kukut Palan Yojana

सुधारीत दराने तलंगा गट वाटपासाठी उर्वरीत ५० टक्के रक्कम म्हणजेच रु. ५,४२०/- आणि १०० एक दिवशीय सुधारित कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटपासाठी उर्वरीत ५० टक्के रक्कम म्हणजेच रु. १४,७५०/- लाभार्थी स्वहिस्सा राहील.

सुधारित दर हे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अर्थसंकल्पित होणाऱ्या निधीमधून राबवावयाच्या योजनेसाठी दि.०१.०४.२०२३ पासून अंमलात येतील.

याचप्रमाने आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी दर पाच वर्षांनी या योजनेंतर्गत वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या किमतीचा तसेच कुक्कुट खाद्य किंमतीचा आढावा घेवून दरामध्ये सुधारणा करावयाचा प्रस्ताव आवश्यक त्या समर्थनासह शासनास सादर करतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: