Kharip vima 10 जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांना पंचनामे उपलब्ध होणार

विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या मात्र तुटपुंजा ( kharip vima) विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसानी पंचनाम्याची प्रत 10 जानेवारी पर्यंत मिळणार – आमदार राणा जगजितसिंह पाटील.

Kharip vima

Kharip vima 2022 Claim survey report

धाराशिव जिल्ह्यातील खरीप २०२२ मधील पंचनामाच्या प्रती 10 जानेवारी पर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार असून तुळजापूर, लोहारा व उमरगा तालुक्यातील उर्वरित अनुज्ञय kharip vima अग्रीम नुकसान भरपाईची रक्कम ३५ कोटी रुपये पुढील आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे.

याबत भारतीय कृषी विमा कंपनीचे मुख्य सांख्यिकी अधिकारी श्री.सिद्धेश रामसुब्रमण्यम यांनी आश्वासित केले असल्याची माहिती आ राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

अतिवृष्टी, गोगलगाय नुकसान, सततचा पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पूर्वसूचना देऊन देखील जिल्ह्यातील जवळपास १.५ लाख शेतकरी विम्यापासून वंचित आहेत.

वाटप झालेल्या शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसान भरपाई देण्यात आली आहे, तर भरपाई दिलेल्या सर्वांनाच नियमबाह्य पद्धतीने ५०% भारांकण लावून निम्मीच नुकसान भरपाई वितरित केली आहे.

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर पिकाच्या नुकसानीचे कंपनीने केलेले पंचनामे उपलब्ध करून देण्याची मागणी विमा कंपनीकडे आमदार राणा पाटील यांच्या कडून करण्यात आली होती.

जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या आदेशानंतरही विमा कंपनीकडून पंचनामे उपलब्ध करून देण्यात येत नव्हते. विभागीय आयुक्तांना याबाबत अवगत करून योग्य ती कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले होते.

याच बरोबर आमदार साहेबांच्या माध्यमातून विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून भारतीय कृषी विमा कंपनीचे दिल्ली येथील मुख्य सांख्यिकी अधिकारी श्री.सिद्धेश रामसुब्रमण्यम यांनी दि.१०/०१/२०२३ पर्यंत पूर्वसूचना प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली आहे.

kharip vima पंचनामे उपलब्ध झाल्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही अनुसरण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा व लोहारा तालुक्यात हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानी साठी अधिसूचना काढण्यात आली होती.

या मधील शिल्लक kharip vima अग्रीम रक्कम ३५ कोटी रुपये देखील पुढील आठवड्यात वितरित करण्याचे कंपनीने मान्य केले असून, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही अशा उर्वरित पात्र शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे.

याचप्रमाणे हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी ३,६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे

या तरतुदितून जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामधील सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाकडून केलेली २२० कोटी रुपयांची रक्कम ही जानेवारी महिन्यात मिळेल अशी माहिती आ राणा पाटील यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: