नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार २५% आगाऊ Kharip pik vima 2022 पीक विमा, खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसुचना नांदेड जिल्ह्यात लागू

Kharip pik vima 2022 Nanded
नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2022 अंतर्गत प्रतिकुल हवामान परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसुचना लागु केली आहे. जिल्ह्यातील काही भागातअतिवृष्टी, पुर, कीड रोग, पावसाच्या पडलेल्या खंडामुळे सोयाबीनच्या फुलांची गळ तर शेंगा परिपक्व न झाल्याने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन आले आहे.
अशा स्थितीत जिल्हयातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या Kharip pik vima 2022 25 टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ अधिसूचना काढण्याबाबत मोठी मागणी केली जात होती.
विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी खुषालसिंह परदेशी यांनी ही अधिसुचना लागु केली आहे.
नांदेड जिल्हयात १ जुलै ते ३०ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी मुळे सोयाबीनचे नुकसान दिसून आल्याने जिल्ह समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना च्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थिती जसे पुर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतुद आहे.
या नियमानुसार समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षीत असल्याने जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांनी सोयाबीन, कापुस, तुर व ख. ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसूचना लागु केली आहे.
सर्व पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विहीत मुदतीत नुकसान भरपाई आगाऊ रक्कम अदा करणेबाबत युनायटेड इंडिया इन्शुरन्स विमा कपंनीस निर्देश दिले आहेत.
नुकसान टक्केवारी Ativrushti nuksan percentile
नुकसान टक्केवारी खालील प्रमाणे असणार आहे.







