Kharip pik vima 2022 राज्यात नोंदणीचा आकडा 60 लाखाच्या घरात

प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY) अंतर्गत kharip pik vima 2022 करिता राज्यात मोठा प्रतिसाद, मराठवाडा अव्वल.

Kharip pik vima 2022

Pradhanmantri fasal bima yojana – kharip pik vima 2022

राज्यात गेल्या तीन वर्षापासून नैसर्गिक आपत्ती ( natural calamities), कीड-रोगाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना दिसत आहे. पीक नुकसानामुळे शेतीच गणित पूर्ण पने बिघडलं आहे, शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेलेलं आहे.

अशा स्थितीत या आपत्ती मुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या हेतूने देशात पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जात आहे.

सन 2022 च्या या खरीप हंगामात जून महिन्यात राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसाने पूर्ण पने ओढ दिली. यामुळे सन 2022 चा खरीप हंगाम ( kharip 2022 ) पूर्णपणे संकटात आला होता.

मात्र जुलैमध्ये झालेल्या जोरदार पाऊसाने काही जिल्ह्यात पूर परीस्थितीदेखील निर्माण झाली होती. अशा या विषम नैसर्गिक परीस्थितीचा खरीप पिकांवर ( kharif crops) खूप मोठा परिणाम झाला आहे.

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

राज्यात 25 जुलै 2022 पर्यंत च्या उपलब्ध आकडेवारीनुसार 50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ( pmfby )आपल्या पिकांचा पीक विमा ( pikvima) उतरवला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये पीक विमा ( pik vima ) काढण्यात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे.

कृषी विभागाच्या आकडेवारी नुसार राज्यात 105 लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी( kharif crops sowing ) झाली आहे. यामध्ये कापूस ( cotton) आणि सोयाबीनचे ( Soyabean) क्षेत्र सर्वाधिक आहे.

कापसाची 36.87 लाख हेक्टर तर सोयाबीनची 38.14 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पावसाचा खंड आणि अती पाऊस यामुळे कडधान्य पिकांच्या लागवडीत घट झाली असून, शेतकरी तेलबिया ( oil seeds croping) आणि कापूस यांसारख्या नगदी पिकांकडे वळत असल्याचं चित्र दिसून येतं आहे.

कडधान्य पिकांच्या पेरणीचा कालावधी संपल्याने राज्यात या हंगामात कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रधानमंत्री पीक योजना या योजनेत आतापर्यंत राज्यातल्या 50 लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

यामध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मराठवाड्यातल्या लातूर आणि औरंगाबाद विभागातल्या सर्वाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी ( kharip pik vima 2022 registration ) नोंदणी केली आहे.

या योजनेत दोन्ही विभागातील पीक कर्ज (Crop Loan) घेतले नसलेल्या शेतकऱ्यांची संख्या कर्ज ( loan account farmers )घेतलेल्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त आहे.

सन २०२१ च्या खरीप हंगामात सुमारे 84.07 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली होती.

इतर वर्षांप्रमाणेच, ज्या शेतकऱ्यांनी संस्थात्मक कर्जाचा पर्याय निवडलेला नाही, त्यांनी पीक विम्याचा पर्याय निवडल्याचं दिसून येतं.

२५ जुलै पर्यंत kharip pik vima 2022 या योजनेसाठी 48.29 लाख बिगर कर्जदार शेतकरी आणि 1.91 लाख कर्जदार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आजपर्यंत विम्याची ( pikvima share) एकूण रक्कम 14,318.31 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या विमा हप्त्यापोटी( pik vima farmer share ) वाटा म्हणून 323.95 कोटी रुपये भरले आहेत. यातली उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकारने भरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: