नांदेड जिल्ह्याची हंगामी पैसेवारी जाहीर | kharif paisewari nanded

kharif paisewari nanded – नांदेड जिल्ह्याची हंगामी पैसेवारी जाहीर, १३ तालुक्यांची पैसेवारी ५० पैश्याच्या आत.

kharif paisewari nanded

kharif paisewari nanded 2022 declared

नांदेड जिल्ह्यात सन 2022 खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.  

शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या हंगामी नजर पैसेवारीमध्ये नांदेड जिल्ह्यातील तब्बल 13 तालुके 50 पेक्षा कमी पैसेवारी आहेत.  मात्र तीन तालुके 50 ते 55 पैशांच्या श्रेणीत दाखवले आहेत.  त्यामुळे या तेरा तालुक्यांना शासनाकडून भरघोस मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

2022 मध्ये सुरुवातीला अतिवृष्टी व नंतर दोनदा झालेला ढगफुटी सदुर्श्य पाऊस यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले.  

खरिप पिकांचेही यात मोठे नुकसान झाले आहे.  

सोयाबीन, कापूस सारख्या नगदी पिके मोठ्या प्रमाणात नुकसान ग्रस्त झाली आहेत.

यामुळे आता पैसेवारी काय येतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, यातच आता 30 सप्टेंबर रोजी  2022-23 चा खरीप हंगाम हंगामी पैसेवारी kharif paisewari nanded शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

 नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 1 हजार 462  महसुली गावातील एकूण लागवडीखालील क्षेत्र 8 लाख 44 हजार 347 हेक्टर आहे.

नांदेड जिल्हा तालुकानिहाय हंगामी पैसेवारी kharif paisewari nanded खालीलप्रमाणे

अर्धापूर 48 

देगलूर 48

कंदहार  47

मुखेड 49

बिलोली 47

लोहा 46

भोकर 49

नायगाव 48

मुदखेड 49

उमरी  49

हदगाव 49

नांदेड 54

किनवट 53

हिमायतनगर 48

धर्माबाद 52

माहूर  47

तर या जाहीर केलेल्या पैसेवारीतून नांदेड  तालुक्यातील तेरा गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला असल्यामुळे या हंगामी पैसेवारी तून ही 13 गावे वगळण्यात आली आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: