बुलढाणा जिल्ह्याची सुधारित खरीप पैसेवारी जाहीर | Buldhana kharip paisewari 2022

पावसाचा खंड, अतिवृष्टी सह विविध नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या बुलढाणा जिल्ह्याची खरिप हंगाम २०२२ Buldhana kharip paisewari ची सुधारित पैसेवारी समिश्र.

Buldhana kharip paisewari

Buldhana kharip paisewari 2022 Sudharit declared.

बुलढाणा जिल्ह्यात या मोसमात सुरुवातीला पावसाचा खंड, अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले परिणामी याचा प्रभाव पिकांच्या पैसेवारी वर दिसून येत आहे.

बुलढाणा जिल्हा प्रशासनाने ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी जाहीर केलेल्या सुधारित पीक पैसेवारीत जिल्ह्यातील एकूण १४१९ महसुली गावांपैकी ७४२ गावांची पैसेवारी ५० च्या आत आली आहे तर ६७७ गावांमध्ये मात्र ही पैसेवारी ५० पेक्षा अधिक दाखविण्यात आली आहे.

जून महिन्यातील पावसाचा खंड, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात सातत्याने पाऊस झाला. पूरही वाहिले. संततधार, अतिवृष्टीने जिल्ह्यात सुमारे ५३ टक्के खरीप क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल देखील प्रशासनाकडूनच तयार केला गेला.

मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची सुधारित Buldhana kharip paisewari पैसेवारी कशी येते याकडे नजर लागली होती.

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत ३१ ऑक्टोबर रोजी सुधारित खरिप हंगाम पैसेवारी Buldhana kharip paisewari जाहीर करण्यात आली.

या सुधारित पैसेवारी नुसार जिल्ह्यातील १४१९ गावापैकी ७ तालुक्यातील सुमारे ६७७ गावाची पैसेवारी ५० पैशा च्या वर तर ७४२ गावे ५० पैशां खाली आहे.

बुलढाणा जिल्हा तालुकानिहाय सुधारित खरिप हंगाम पैसेवारी

बुलडाणा तालुक्यातील ९८ गावांची पैसेवारी ४६ पैसे आलेली आहे.

चिखली तालुक्याची ५७ पैसे (१४४ गावे),

देऊळगावराजा ४८ पैसे (६४ गावे),

मेहकर ४७ (१६१),

लोणार ५८ (९१),

सिंदखेडराजा ४७ (११४),

मलकापूर ४८ (७३),

मोताळा ४७ (१२०),

नांदुरा ४५ (११२),

खामगाव ५४ (१४५),

शेगाव ६४ (७३),

जळगाव जामोद ५६ (११९),

संग्रामपूर ५१ (१०५ गावे) आहेत.

या सुधारित आता १५ डिसेंबर नंतर अंतिम पैसेवारी जाहीर केली जाईल.

या नंतर पैसेवारी वर आधारित दुष्काळाचा शिक्कामोर्तब होत असतो. अंतिम पैसेवारी आल्यानंतर जिल्ह्यात कुठला भाग दुष्काळी आहे, हे ठरवले जाते.

५० पैशांच्या आत पैसेवारी असलेले तालुके

बुलडाणा, देऊळगावराजा, मेहकर, सिंदखेडराजा, मोताळा, मलकापूर, नांदुरा,

५० पैशां पेक्षा जास्त पैसेवारी असलेले तालुके

चिखली, लोणार, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: