फळबाग लागवडीला १००% अनुदान | Bhausaheb fundkar falbag lagvad 2023

राज्यातील शेतकऱ्यांना १६ प्रकारच्या फळबाग लागवडी करिता १००% अनुदान Bhausaheb fundkar falbag lagvad 2023 पहा काय आहेत अटी पात्रता निकष, अनुदान सविस्तर

राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी करीता पात्र ठरु शकत नाहीत अशा शेतक-यांसाठी राज्य शासनाने स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ( Bhausaheb fundkar falbag lagvad 2023) सुरु केली आहे. मात्र कोवीड १९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सन २०२०-२१ व सन २०२१-२२ या वर्षांसाठी आर्थिक लक्षांक न देता फक्त सन २०१९-२० मधील लागवडीच्या व्दितीय व तृतीय वर्षासाठीचे दायित्व भागविण्यासाठी निधी दिला.

मात्र आता शासनाने ₹१०४ कोटी निधी सह ही योजना २०२२-२३ मध्ये राबविण्यास मंजुरी दिली आहे.

Bhausaheb fundkar falbag lagvad 2023 योजना अंमलबजावणी राज्यातील संपूर्ण ३४ जिल्ह्यात करण्यात येते.

अखेर खताला अनुदान सुरू Bhausaheb fundakar falbag lagwad scheme

GR link – भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन २०२३-२४ पासून राबविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या बदलास मान्यता मिळणेबाबत

Bhausaheb fundkar falbag lagvad 2023 लाभार्थी पात्रता

खालील अटींची पूर्तता करणारे शेतकरी योजनेचा लाभासाठी पात्र असतात.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी करीता पात्र ठरु शकत नाहीत असे शेतकरी Bhausaheb fundkar falbag lagvad 2023 या योजने अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.

शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावे ७/१२ असणे आवश्यक आहे. जर ७/१२ उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र व जमिन कुळकायदयाखाली येत असल्यास ७/१२ च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक राहील.

महाडिबीटी ( MahaDBT farmer scheme portal) वर प्राप्त झालेल्या अर्जामधून सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येते.

Bhausaheb fundkar falbag lagvad 2023 क्षेत्र मर्यादा

Bhausaheb fundkar falbag lagvad 2023 योजने अंतर्गत फळबाग लागवडीकरीता कोकण विभागासाठी किमान ०.१० हेक्टर ते कमाल १०.०० हेक्टर तर उर्वरीत विभागासाठी किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर क्षेत्र मर्यादाला लाभ दिला जातो.

या कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करु शकतात.

याचप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर योजनेचा दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरीत क्षेत्रासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमूधन लाभ घेता येईल.शेतकऱ्याने यापूर्वी राज्य रोजगार हमी योजनेशी MGNREGA falbag निगडीत फळबाग लागवड वा अन्य योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरीत कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभार्थी पात्र राहील.

Bhausaheb fundkar falbag lagvad 2023 लाभासाठी समाविष्ट फळबागा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत पुढीलप्रमाणे १६ बहूवार्षिक फळपिकांचा समावेश करण्यात आलेली आहे.

Bhausaheb fundkar falbag lagvad 2023

Bhausaheb fundkar falbag lagvad 2023 अनुदान

या योजनेसाठी राज्य शासनाचे १०० टक्के अनुदान आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये शासन अनुदानीत बाबींसाठी पुढील तक्त्यात दर्शविलेल्या कामांचा समावेश राहील.

शेतक-याने स्वखर्चाने करावयाची कामे खालील प्रमाणे आहेत.

जमीन तयार करणे,

माती व शेणखत / सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे,

रासायनिक खते देणे

आंतर मशागत करणे

काटेरी झाडांचे कुंपण करणे

तर खालील कामे १००% शासन अनुदानीत आहेत.

खड्डे खोदणे.

कलमे/ रोपे लागवड करणे.

पीक संरक्षण.

नांग्या भरणे.

ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे.

Bhausaheb fundkar falbag lagvad

Bhausaheb fundkar falbag lagvad 2023 अर्ज कसा करावा.

सर्व इच्छुक शेतकऱ्यांना महा डीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि आपल्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे तथापी, सदर प्रक्रिया शेतकऱ्यांना एकदाच करावी लागणार आहे.

यासाठी महा डीबीटी पोर्टलचे ( MahaDBT farmer scheme portal) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच ठिबक सिंचन या बाबी करीता https://mahadbtmahait.gov.in/ या संकेत स्थळावर वेगवेगळे अर्ज करावेत संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.

अर्जदार नोंदणी अर्जदारांनी प्रथमतः वापरकर्त्याचे नाव (User name) व संकेतशब्द (Password) तयार करून घ्यावा व आपले खाते उघडावे. महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याबाबत सविस्तर माहिती User manual द्वारे दिली असून ते पोर्टलवर माहितीस्तव ठेवण्यात आलेले आहे.

अर्ज शुल्क: अर्ज सादर करतेवेळी शेतकऱ्यांनी रु. २०/- शुल्क व रु. ३.६०/- जी.एस.टी. मिळून एकूण रु.२३.६०/- शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे तदनंतर, महा- आयटी महामंडळाकडे शेतकऱ्यांचा अर्ज पुढील प्रक्रीयेकरिता पाठविला जाईल.

पूर्वसंमती नंतर ७५ दिवसात सर्व बाबींसह फळबागेची लागवड करावी.

तालुका कृषि अधिकारी यांचे मार्फत अदा केलेल्या परवान्यावर कलमा / रोपांची उचल केल्यानंतर लागवड करणे आवश्यक आहे.

शासनाने निश्चित केलेली फळपिके व लागवडीचे अंतर प्रमाणे अनुदान देय राहील. जास्त लागवड केलेल्या कलम / रोपे स्वखर्चाने लागवड करण्यात यावी. परवान्यावर घेतलेल्या कलमा/ रोपांची लागवड न केल्यास कलमे / रोपांची रक्कम शासनास परत करण्याची जबाबदारी राहील अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

ठिबक सिंचन संच ७ वर्षापर्यंत त्याच शेतात कायम ठेवणे अनिवार्य राहील.

कागदी लिंबू, संत्रा व मोसंबी या लिंबूवर्गीय फळपिकांच्या लागवडीकरीता माती परिक्षण अनिवार्य राहील. माती परिक्षण शेतकऱ्याने स्वखर्चाने करावे. त्याचा अहवाल कागदपत्रकांबरोबर अपलोड करावा.

लाभार्थ्याने फळबाग लागवडीकरीता जमीन तयार करणे, माती व शेणखत / सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे, रासायनिक खत वापरुन खड्डे भरणे, आंतर मशागत करणे आणि काटेरी झाडांचे कुंपण करणे इत्यादी कामे पूर्ण करण्याची जबाबदारी राहील.

लाभार्थ्याने लावलेली फळझाडे पहिल्या वर्षी किमान ८० टक्के व दुसऱ्या वर्षी किमान ९० टक्के जगविणे आवश्यक राहील.

लागवडीची अंदाजपत्रके तयार करुन त्यास सक्षम प्राधिकाऱ्याची तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्या नंतरच लाभार्थ्याने फळबागेची लागवड करावी.

for PDF Click Here

PDF

https://www.prabhudevalg.com/2022/12/2023-bhausaheb-fundkar-falbag-lagvad.html

1 thought on “फळबाग लागवडीला १००% अनुदान | Bhausaheb fundkar falbag lagvad 2023”

  1. या योजनांचे मला खूप फायदा झाला आहे. या योजनेनुसार मी माझ्या काही शेतात फळबाग लागवड केली आहे. अणि मला अनुदान देखील मिळाले आहेत. Thank team.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: