या जिल्ह्याचे नवीन आपले सरकार सेवा केंद्र अर्ज सुरू | ASSK registration 2023

रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केन्द्रा साठी नवीन अर्ज ( ASSK registration 2023 ) मागविण्यात आले आहेत. रिक्त जागा, अटी शर्ती, अर्जाचा नमुना सविस्तर माहिती.

ASSK registration 2023

ASSK registration 2023

आपले सरकार सेवा केंद्रा च्या माध्यमातून नागरिकांना महत्वाच्या शासकीय सेवा देण्यासोबत तरुणांना रोजगाराचा एक नवा पर्याय देखील उपलब्ध होतो.

याच आपले सरकार सेवा केद्राच्या नवीन नोंदणी साठी बीड शहर आणि बीड ग्रामीण नवीन जागांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.

यातील बीड शहर 22 आणि बीड ग्रामीण 259 भागासाठी रिक्त असलेल्या 281 केंद्र करिता हे अर्ज मागविण्यात आले असून याकरिता 12 जून 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

या केंद्रा करिता अर्ज 14 जून 2023 – 23 जून 2023 दरम्यान स्वीकारले जातील.

आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा केंद्र) मंजुर करणेबाबत. Click here for pdf

Aaple Sarkar Seva Kendra Active Center List, Application Form and Vacant List

Form PDF click here

यासाठी ONline पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे,

https://forms.gle/yyhpyumCQJsjTgFG9 शहर आणि नागपूर ग्रामीण भागासाठी ज्या कार्यक्षेत्रात  आपले  सेवा केंद्र स्थापीत आहेत त्या बाबतची माहिती या कार्यालयामार्फत काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

बीड शहर आणि बीड ग्रामीण भागासाठी ज्या कार्यक्षेत्रात  आपले  सेवा केंद्र स्थापीत आहेत त्या बाबतची माहिती या कार्यालयामार्फत काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग व सामन्य प्रशासन विभागाच्या वतीने शासन निर्णयाअन्वये केंद्रशासनाच्या राष्ट्रीय ई- गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकापर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहचविण्यासाठी शासनाच्या वतीने आपले सरकार सेवा केंद्रे हे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नगरपंचायत कार्यक्षेत्रात नगर परिषद कार्यक्षेत्रात व तसेच महानगर पालिका कार्यक्षेत्रात आपले सरकार सेवा केंद्रे स्थापीत करणे बाबतचा उक्त शासन निर्णयाव्दारे निर्णय घेण्यात आलेला आहे.

आपले सरकार सेवा केंद्रासाठी अटी व शर्ती पूढील प्रमाणे आहेत.- आपले सरकार सेवा केंद्रामार्फत महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2018 मधील परीशिष्ट क मध्ये नमुद केलेल्या सर्व सेवा नागरीकांना देणे आवश्यक आहे. या शासन निर्णयातील परीशिष्ट ड मध्ये नमुद केलेल्या विहीत नमुन्याप्रमाणे आपले सरकार सेवाकेद्राचा बोर्ड / फलक लावणे आवश्यक आहे.

आपले सरकार सेवा केंद्र मंजूर ठिकाणीच चालविण्यात यावे अन्यथा इतर ठिकाणी आढळून आल्यास त्यांचेवर कार्यवाही करण्यात येईल. नागरीकांकडून स्वकारण्यात येणाऱ्या पेमेंटसाठी ई-सुविधा उपलब्ध् करुन दयाव्यात, डिजिटल पेमेंटला प्राधान्य देणे. शासनाने ठरवुन दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केद्र चालु ठेवुन नागरीकांना सेवा पुरविणे.

शासनाने ठरवून दिलेल्या कॉमन ब्रॅडींगचा वापर करणे तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने स्थापन केलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा तपशील आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करणे. 

शासनाने ठरवून दिलेले दर केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करणे तसेच ठरवुन दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे. 

शासनाने पुरविलेल्या वस्तू आज्ञावली इ. चे वापर संरक्षण जतन करणे. सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणुक देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे. 

विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवुन दिलेले वेळापत्रक व निर्देश काटेकारेपणे पाळणे. 

ज्या अर्जदारांकडे CSC ID नाहीत अशा अर्जदारांनी CSC ID काढणे आवश्यक आहे.

आपले सरकार सेवा केद्र स्थापन करण्यासाठी संबंधित गावातील इच्छुक अर्जदाराने विहीत नमुन्यातील अर्ज  जिल्हाधिकारी कार्यालयास करु शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: