वाशीम जिल्ह्याची खरिप पिकांची पैसेवारी ( antim paisewari ) 48 पैशावर, जिल्ह्याच्या दुष्काळावर शिक्का मोर्तब; शेतकऱ्यांची शासनाच्या मदती कडे नजर.

antim paisewari 2022 jahir वाशीम जिल्हा खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 48 पैसे
राज्यात खरीप हंगामातील पीक परिस्थितीची पाहणी करून पैसेवारी काढली जाते. यामध्ये सुरुवातीला ३० ऑक्टोबरला सुधारित पैसेवारी जाहिर केली गेली होती, मात्र आता शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम पैसेवारी कडे लागले होते.
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सर्व भागात सारखा पाऊस झाला नाही. पेरण्यांना उशिराने सुरवात झाली. त्यानंतर जून ते ऑगस्ट व शेवटी ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे आता आणेवारी वर काय परिणाम होतोय याकडे सर्वांचे लक्ष होते.
यानंतरच्या काळातही पिकांमध्ये पाहिजे तशी सुधारणा झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश पिके हातातून गेली.
जिल्हा प्रशासनाने antim paisewari पैसेवारी जाहीर केली यामुळे जिल्ह्याच्या दुष्काळ सदृश्य स्थितीवर शिक्का मोर्तब झाला आहे.
खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी 48 पैसे सन 2023-24 च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी 48 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकूण 793 महसूल गावे आहेत.यातील सर्वच 793 गावांची खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे.
वाशिम तालुक्यात एकूण 131 महसुली गावे आहेत.या सर्व 131 गावांची पैसेवारी 48 पैसे इतकी आहे. मालेगाव तालुक्यातील 122 गावे आहे, या 122 गावांची पैसेवारी 49 पैसे आहे.
शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते.
यामुळे पैसेवारीही कमी येत आहे. वास्तविक पहाता शेतीचे नुकसान होणे, हा प्रकारच नकारात्मक आहे. यामुळेच पैसेवारी कमी होते.