Annasaheb patil karj yojana 2022 आता तरुणांना व्यवसायासाठी १५ लाख कर्ज

Annasaheb patil karj yojana 2022 तरुणांना स्वतः चा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ च्या माध्यमातून १५ लाख रुपये कर्जासाठी व्याज सवलत देण्यात येत आहे.

Annasaheb patil karj yojana 2022

annasaheb patil karj yojana 2022 limit increased

राज्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मराठा समाजातील युवक युवतींना उद्योगासाठी प्रोत्साहित करण्याकरता विविध योजना राबवल्या जातात.

याच योजनांमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर बनण्याकरता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा दहा लाखावरून पंधरा लाख करण्यात आलेली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून ( Annasaheb patil karj yojana 2022 ) गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना राबवली जात असून आर्थिक मागास असलेल्या घटकापर्यंत विशेष करून बेरोजगार युवकापर्यंत त्या योजना पोहोचवून त्यांना सक्षम बनवणं, या योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिक दृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणं अशा प्रकारचे काही महत्त्वपूर्ण उद्देश घेऊन ही योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जातात.

याच्याच अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा आता दहा लाखावरून पंधरा लाख रुपये करण्यात आलेली आहे.

मराठा समाजातील नवोद्योजकांना हात देण्यासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 2 फेब्रुवारी 2018 रोजी गेलेली आहे.

महामंडळाकडून तरुणांना उद्योगासाठी व्याज परतावा दिला जातो पूर्वी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांची कर्ज लाभार्थ्यांना दिली जात असत त्यावर तीन लाख रुपयापर्यंत व्याज परतावा दिला जात होता. मात्र आता नवीन नियमानुसार 20 मे 2022 पासून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 15 लाख रुपये कर्ज दिले जात असून या कर्जावर साडेचार लाख रुपयांचा व्याज परतावा दिला जात आहे.

या योजनेच्या कर्ज योजनेचा अर्ज करण्यासाठी, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे अपेक्षित आहे.

याच्यासाठी https://udyog.mahaswayam.gov.in/#/home या संकेतस्थळावरती योजना निहाय ऑनलाईन नोंदणी करावी लागते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: