अतिवृष्टी बाधित झालेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा ( Amravati pik vima ) भरपाई मिळावी यासाठी अमरावती जिल्हाधिाऱ्यांमार्फत अधिसूचना निर्गमित.

Amravati pik vima update 2022
अमरावती जिल्ह्यात संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिवळे पडले आहे. ढगाळ वातावरण सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे.
यामुळे पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे या प्रतिकूलतेमुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट अपेक्षित आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 3 सप्टेंबरला पिकविमा कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, के व्ही के शास्त्रज्ञ व तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली.
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार 12 सप्टेंबरला झालेल्या जिल्हा सनियंत्रण सभेत याविषयी चर्चा होऊन सोयाबीन पिकाकरिता अधिसूचना लागू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या अधिसूचनेनुसार नुकसानग्रस्त पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनी द्वारा एक महिन्याच्या आत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सूचना देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना आगाऊ स्वरूपात देण्यात आलेली ही रक्कम अंतिम भरपाईत समायोजित करण्यात येते.
जिल्हाधिकाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील बारा तालुक्यातील 80 महसूल मंडळातील सोयाबीन पिकासाठी अधिसूचना लागू केली आहे.
यामध्ये अमरावती तालुक्यातील १२ मंडळांचा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ८, भातकुली तालुक्यातील ६ मंडळांचा, धामणगाव रेल्वे ७, चांदूर रेल्वे ५, मोर्शी ६, वरुड ७, चांदूरबाजार ७, तीवसा तालुक्यातील ५, अचलपूर ६, धारणी ५, चिखलदरा तालुक्यातील ६ महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.