जिल्ह्याची खरिप पिकांची पैसेवारी ( akola antim paisewari ) 50 पैशाखाली घसरली, अंतिम आणेवारी जाहीर.

Akola antim paisewari 2022 jahir अकोला खरीप पिकांची 2022 ची अंतिम आणेवारी जाहीर.
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सर्व भागात सारखा पाऊस झाला नाही. पेरण्यांना उशिराने सुरवात झाली. त्यानंतर जून जुलै पावसाचा खंड व शेवटी ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे आता आणेवारी वर काय परिणाम होतोय याकडे सर्वांचे लक्ष होते.
शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते.
यंदाच्या (२०२२) खरीप हंगामातील ( antim paisewari Kharip Season) पिकांची अंतिम आणेवारी / पैसेवारी जिल्हा प्रशासनातर्फे शुक्रवारी (ता. ३० ) जाहीर करण्यात आली. त्यानुसार अकोला ( akola Kharip paisewari ) जिल्ह्याची अंतिम पैसेवारी सरासरी ५० पैशापेक्षा कमी दाखविण्यात आली आहे.
जिल्ह्याची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४८ पैसे.
सन 2022-23 या वर्षाकरीता तहसिलदार यांच्याकडुन प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी हंगामी अंतिम पैसेवारी 48 पैसा इतकी जाहिर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
तालुक्यानिहाय हंगामी पैसेवारी
अकोला 45 पैसे,
अकोट 48 पैसे,
तेल्हारा 47 पैसे,
बाळापूर 51 पैसे,
पातूर 51 पैसे,
मुर्तिजापूर 46 पैसे
बार्शीटाकळी 50 पैसे
असे सरासरी 48 पैस निश्चित करण्यात आली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. नियमित पावसापेक्षा परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे.
यामुळे पैसेवारीही कमी येत आहे. वास्तविक पहाता शेतीचे नुकसान होणे, हा प्रकारच नकारात्मक आहे. यामुळेच पैसेवारी कमी होते, अनुदान व विम्यासाठी ही पैसेवारी योग्य नसल्याचे सांगण्यात येते.
Akola antim paisewari