Agri Supervisor bharti – महाराष्ट्र शासन कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू, जाहिरात प्रसिद्ध. जाणून घेऊयात सविस्तर पात्रता, अटी, विभागनिहाय पद, वेतन, ऑनलाईन अर्ज कसा करायचा.
सादर विभागात कार्यरत असणाऱ्या कृषि सहाय्यक (गट-क) या संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे गुणवत्तेच्या आधारे निवड करून भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव – कृषी पर्यवेक्षक गट क – Agri Supervisor bharti
या पदासाठी अर्ज करण्यास महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहाय्यक, गट-क या पदावर दिनांक ०१ जानेवारी, २०२३ रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेल्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असतील.
Agri Supervisor bharti वेतन श्रेणी
वेतन स्तर S १३ – ३४,५०० – १,१२,४००
Agri Supervisor bharti किमान अर्हता
महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहाय्यक, गट-क या पदावर दिनांक ०१ जानेवारी, २०२३ रोजी पाच वर्षे नियमित सेवा.
कृषि सहायक पदावर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती,
शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती
Agri Supervisor bharti परीक्षा शुल्क
सदर परीक्षेकरीता प्रती उमेदवार रु. ६५०/- एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात येईल.
निवडीचे निकष
कृषि पर्यवेक्षक (गट- क) या संवर्गातील पदावरील मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे करावयाच्या नियुक्त्या या सदरच्या परीक्षेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करून, करण्यात येतील.
परीक्षेद्वारे निवडीसाठी आवश्यक किमान गुण व परीक्षेमध्ये उमेदवारांना समान गुण मिळाल्यास गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का. १३-अ, दि.४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार राहील.
Promotion to the Post of Agriculture Supervisor / ‘कृषी पर्यवेक्षक ‘
Important Events | Dates |
---|---|
Commencement of on-line registration of application | 14/01/2023 |
Closure of registration of application | 28/01/2023 |
Closure for editing application details | 28/01/2023 |
Last date for printing your application | 12/02/2023 |
Online Fee Payment | 14/01/2023 to 28/01/2023 |
Link for Application
- कृषी पर्यवेक्षक मर्यादित विभागिय परीक्षा जाहिरात औरंगाबाद PDF
- कृषी पर्यवेक्षक मर्यादित विभागिय परीक्षा जाहिरात पुणे PDF
- कृषी पर्यवेक्षक मर्यादित विभागिय परीक्षा जाहिरात ठाणे PDF
- कृषी पर्यवेक्षक मर्यादित विभागिय परीक्षा जाहिरात नाशिक PDF
- कृषी पर्यवेक्षक मर्यादित विभागिय परीक्षा जाहिरात कोल्हापूर PDF
- कृषी पर्यवेक्षक मर्यादित विभागिय परीक्षा जाहिरात नागपूर PDF
- कृषी पर्यवेक्षक मर्यादित विभागिय परीक्षा जाहिरात अमरावती PDF
- कृषी पर्यवेक्षक मर्यादित विभागिय परीक्षा जाहिरात लातूर PDF
कृषी पर्यवेक्षक भरती परीक्षेचा अभ्यासक्रम
सदर परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम शासन अधिसूचना कृषि व पदुम विभाग, दि. २८ नोव्हेंबर, २०१८ अन्वये विहित करण्यात आल्यानुसार राहील.
विभागीय परीक्षेसाठी दोन पेपर असतील: सामान्य विषय (पेपर- १) व कृषि विभागाचे विषय (पेपर-२).
प्रत्येक पेपरसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे १०० प्रश्न आणि तितकेच गुण आणि ९० मिनिटांचा कालावधी असेल.
कृषी पर्यवेक्षक भरती ऑनलाईन अर्जासाठी महत्वाच्या सूचना
ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे / स्वाक्षरी इत्यादींचे स्कॅन करून ठेवावे :
छायाचित्र (४.५ सें. मी. X ३.५ सें.मी.)
स्वतःची स्वाक्षरी (काळ्या शाईने)
स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा (काळ्या किंवा निळ्या शाईच्या पांढऱ्या कागदावर )
इंग्रजी भाषेतील खाली दिलेला मजकुर असलेले स्वहस्ताक्षरात लिहिलेले घोषणापत्र (पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने)
हे सर्व स्कॅन केलेले दस्तऐवज या जाहिरातीतील मुद्दा ९.३ मध्ये नमूद तपशिलाप्रमाणे आहेत याची खात्री उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी करावी.
इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील (Capital Letters) स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही. डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरित्या स्कॅन केलेला असावा आणि त्यावर डाग येऊ देऊ नये. (उमेदवारास डावा अंगठा नसल्यास असा उमेदवार अर्ज करण्यासाठी उजव्या अंगठ्याचा वापर करू शकतो.)
अर्ज करण्यासाठी इतर सूचना :
उमेदवाराचे नाव, वडिलांचे, पतीचे नाव, आडनाव, आईचे नाव, जन्मदिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक, छायाचित्र, स्वाक्षरी, पत्रव्यवहाराचा पत्ता ही मुलभूत माहिती आहे जी उमेदवाराला सविस्तर द्यावी लागेल.
पत्ता नमूद करताना उमेदवाराने आपल्या पत्त्याचा प्रकार निश्चित करावा. ( उदा. पत्रव्यवहाराचा पत्ता व कायमचा पत्ता किंवा दोन्ही.)
त्यानंतर उमेदवाराने अतिरिक्त माहितीच्या पर्यायावर क्लिक करावे आणि आपल्या जात प्रवर्गाबद्दल माहिती भरावी.
ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे त्यांनी तत्संबंधी माहिती भरावी तसेच उमेदवाराने आधार क्रमांक/ आधार नोंदणी क्रमांक याबद्दलची माहिती द्यावी.
मराठी भाषेतील प्राविण्य, MS-CIT प्रमाणपत्र (D.O.E.A.C.C सोसायटीच्या अधिकृत C.C.C किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र) या संबंधीची माहिती भरावी.
अनुभवाच्या जागी उमेदवाराने कृषि सहाय्यक पदावर नियमित नियुक्तीने हजर झालेला दिनांक नमूद करावा. कृषि सेवक पदावरील सेवा अनुभव म्हणून गृहीत धरली जाणार नाही.
एकदा शैक्षणिक तपशिल प्रविष्ट केल्यानंतर अर्जदारास पुढे (Next) या बटणावर क्लिक करावे लागेल, त्या बटणावर क्लिक केल्यानंतर अर्जदाराकडून पुष्टीची विनंती केली जाईल की त्यांनी ते बटण क्लिक केल्यास मागील तपशील संपादित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.