५०,००० अनुदानाची दुसरी यादी आली, चेक करा आपल नाव | 50000 anudan 2nd list

50000 anudan 2nd list

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन पर ५०,००० अनुदानासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी ( 50000 anudan 2nd list ) प्रसिद्ध

50000 anudan 2nd list

50000 anudan 2nd list

सन्मान योजनेतील प्रोत्साहनपर रक्कमेच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द 50000 anudan yojana maharashtra list

महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान योजनेतील प्रोत्साहनपर लाभार्थ्यांची दुसरी यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी पात्र शेतकऱ्यांनी या यादीचे अवलोकन करून नाव असल्याची खातरजमा करावी, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कळविले आहे.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान योजना अंतर्गत सन 2017 ते 2020 या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पिक कर्जाची उचल करून विहीत मुदतीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वरील कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पिक कर्जाच्या मुद्दल रक्कमेवर जास्तीत जास्त 50 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

ज्या शेतकऱ्यांचे नांव दुसऱ्या यादीत आलेले आहे अशा शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, चावडी, तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या कार्यालयात यादी 50000 anudan 2nd list 7 डिसेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा व राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा तसेच आपले सरकार सेवा केंद्र येथे आधार कार्ड व बँक पासबुक प्रमाणीत करून घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: